नांदेड| सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी श्री किरण आंबेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरडीसी आंबेकर यांनी शिष्टमंडळा सोबत चर्चा केली व लवकरच सर्वांचे दावे स्वीकारण्यात यावेत असे लेखी आदेश काढण्यात येतील असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले.


जिल्ह्यातील अनेक कामगारांकडे नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा व फॉरेस्टच्या जमिनी वडिलोपार्जित व पारंपरिक आहेत. त्यांचा त्या जमिनीवर दोन ते तीन पिढ्यापासून ताबा आहे. अनेक ठिकाणच्या जमिनी सुपीक व वहितीत आहेत परंतु त्या जमिनीचे पट्टे व सातबारा अजून काहींना मिळाले नाहीत. वन विभागा मार्फत ताब्यातील जमिनीवरून मजूर असलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचे कट कारस्थान फॉरेस्ट च्या कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यात राबविले जात आहे. शेतात खड्डे करून झाडे लावण्याची योजना शासना मार्फत राबविल्या जात आहे.


या ब्रिटिश कालीन कटू नीती विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटनेने दंड थोपटले असून मजूर असलेल्या कामगारांना शेतकरी बनविण्याचा विडा उचललेला आहे आहे असे सीटू चे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी आपल्या भाषणात नमूद केले. सीटू चे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाल कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा विद्युत भवन नांदेड येथून दुपारी एक वाजता मजूर असलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. भोकर, माहूर, मुदखेड, हिमायतनगर येथील पीडित शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्त मोर्चात सहभाग नोंदविला.



नाशिक येथे ४५ हजार पट्टे करून देण्यात लाल बावट्याला यश आले असून त्याच धरतीवर नांदेड जिल्ह्यातील अल्पभूधारक मजूर शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे व सातबारा मिळवून देण्यात येणार आहेत. वन हक्क कायदा २००६ ची प्रभाविपणे अंमलबजावणी करावी,१३ डिसेंबर २००५ पूर्वी पासून ताबा असलेल्या सर्व जमिनी कास्तकारांच्या नावे करून द्याव्यात. शेतामध्ये खड्डे खोदून झाडे लावण्याची कार्यवाही तातडीने थांबविण्यात यावी.ज्या गावातून दावे दाखल करण्यात येणार आहेत त्या गावामध्ये तात्काळ विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे.सादर करण्यात येणारे दावे तात्काळ उप विभागीय समिती कडे पाठविण्यात यावेत.तसेच जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी महोदयांनी त्या दाव्याना अंतिम मंजूरी द्यावी.काही शेतकऱ्यांच्या सातबारा वरील नावे उडवून सरकारी पट्टेदार करण्यात आले आहे.


ती दुरुस्ती ताबडतोब करून द्यावी. आदी कायदेशीर मागण्या सदरील मोर्चा मध्ये करण्यात आल्या आहेत. बाचोटी कॅम्प ता.भोकर येथे दलित शेतकऱ्यांच्या शेतात खड्डे खोदण्यासाठी जेसीबी मशीन नेऊन ठेवण्यात आली असून फॉरेस्टचे गार्ड केंद्रे आणि वन परीक्षेत्र अधिकारी श्री रासने यांनी जातीयद्वेष्यातून कारस्थान रचून मजूर शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे. त्या दोघांवर तातडीने कायदेशीर कार्यवाही करावी व त्यांचे निलंबन करून तातडीने जमिनीचे पट्टे व सातबारा देण्यात यावा ह्या मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु असूनही मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने मजूर शेतकरी सामील झाले होते.
सदरील मोर्चाचे नेतृत्व सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड, सीटू राज्य कमिटी सभासद कॉ.करवंदा गायकवाड, डीवायएफ तालुका अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाड, कॉ. बालाजी पाटील भोसले, भोकर तालुका अध्यक्ष कॉ. देवानंद कुंचेवार,संतोष वाघमारे,दशरथ वाघमारे,गजानन खुपसे,जळबा राजकौर,केशव वाघमारे, शंकर बोथकर, विजय सूर्यवंशी,जळबा वाघमारे,संग्राम ननुरे,सुनील वाघमारे, कुलदीपसिंग ठाकुर, लालासाहेब पागे,कॉ. सुभाषचंद्र गजभारे,कॉ.मंगेश वट्टेवाड, राहुल नरवाडे आदींनी नेतृत्व केले. अशी माहिती नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.


