उस्माननगर l उस्माननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर दि.१८ जुन रोजी रात्री आठ च्या सुमारास कापसी ते गोळेगाव जाणा-या रोडवरील कॅनाल जवळ पकडून कारवाई करण्यात आली .


टिप्पर क्र.एम.एच.- २६ / एच.७२१८ यामध्ये अवैध रेती भरून जादा दराने विक्रीसाठी घेऊन जात आसतांना दि. १८ जुन रोजी रात्री आठच्या दरम्यान उस्माननगर पोलीसांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून अवैध रेती वहातूक करणारे टिप्पर पकडले .जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी अवैरित्या वाळू उपसा करून चोरी करणा-या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन उस्माननगर येथील संजय निलपत्रेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.ठाणे उस्माननगर, पोउपनि गजानन गाडेकर , पोहेकाॅ सुशील कुबडे ,रेजितवाड ,पो काॅ वरपडे,पवार ,चालक पो.काॅ.बलवंत कांबळे हे गस्त घालत असतांना गोपनिय माहितीच्या आधारे कापसी ते गोळेगाव जाणा-या रोडवरील कॅनाॅल जवळ रेतीची चोरटी वहातूक करीत आहेत.

हे समजल्यावर त्या ठिकाणी गेल्यावर तेथे टाटा कंपनीचे टिप्पर एम.एच – २६/एच, ७२१८ कि.४,५०,०००रू. रेती दोन ब्रास किंमत १०,०००रू.चा विना परवाना बेकायदेशीररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करित आसतांना एकूण ४,६०,०००रू.चा मुद्देमाल मीळून आल्याने पोकाॅ आप्पाराव वरपडे यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपी विरुध्द गु.र.न.१२०/२०२५ कलम – ३०३ ( २),३ ( ५ ),भा.न्या.सं.सह कलम ४८(७ ) नुसार ज.म .अधिनियम कायद्याप्रमाणे उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामगीरीबद्दल पोलीस अधीक्षक यांनी उस्माननगर पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
