देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून लुबाडणूक होत असुन ही लूट त्वरित थांबवावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार भरतसुर्यवंशी साहेब, गटविकास अधिकारी माळेगांवकर साहेब पोलिस निरीक्षक मुंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.


याबाबत अधिक माहिती अशी देगलूर तालुक्यामध्ये ११ हजार घरकुल लाभार्थ्यांचे बिले काढण्यासाठी घराची फोटो काढून झाल्यानंतर लाभार्थ्याकडे दहा पंधरा हजार रुपयाची मागणी करत आहेत सर्वसामान्य लाभार्थ्यांची होत असलेली लूट गंभीर बाब आहे व तसेच तालुक्यातील सिंचन विहिर,पाणंद रस्ते इत्यादी एमआरजीएस अंतर्गत होणाऱ्या कामाची संबंधित विभागाचे कर्मचारी पैशाची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करून लूट करत आहेत.

गटविकास अधिकारी साहेबांनी यामध्ये लवकरात लवकर दखल देऊन या दोषी कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी अन्यथा ३० जुन रोजी पंचायत समिती कार्यालय देगलूर येथे ठिय्या आंदोलन करून व भिक मागो आंदोलन करण्यात येईल.

याची प्रशासनाने दखल घ्यावी असे निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील शिवसेना देगलूर तालुका प्रमुख बालाजी इंगळे पाटील खुतमापुरकर , खुतमापुर येथील सरपंच बालाजी चोपडे, मुजळगा विभाग प्रमुख माजी सरपंच राजु उल्लेवार , कावळगड्डा येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश पाटील,कावळगड्डा येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख शिवाजी जाधव पाटील सरपंच मा श्री आकाश गजले येथील युवा नेते मा श्री योगेश पाटील , येथील शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजी सोनकांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थितीत होते.
