नांदेड l भारतीय स्टेट बॅंक,नवा मोंढा, नांदेड येथे रक्तदान शिबीराच आयोजन करण्यात आल होत. भारतीय स्टेट बँकेला एक जुलै रोजी ७० वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्त आयोजित कारण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात बॅंक कर्मचाऱ्यांसह बॅंक ग्राहकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता.


भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक रामा अयंगरी,प्रबंधक आर.आर.मुनेश्वर,सेवा प्रबंधक सुषमा देवदास,क्षेत्रीय अधिकारी विजय कुमार, प्रबोधन भावसार,सामाजिक कार्यकर्ते श्याम निलंगेकर,रोशन भट्टड, प्रभावती राठोड, भाग्यश्री दरिरा, अमोल भंडारी, शैलेश गोलाईतकर, सुमित देशमुख, अर्चना मुगटकर,सुनीता वाल्मिकी,कावेरी ढगे यांची उपस्थिती होती.रक्तदान संकलन करण्यासाठी नंदीग्राम ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.

रक्तदान रामराम मुनेश्वर, प्रबोधन भावसार, विजयकुमार,अमोल भंडारे,राजेश,अनिल थोरात, सुभाष मुखेडे, गजानन जिरोनकर,नवनाथ पाटील, सुमीत देशमुख,अनिल झिजारे,साईप्रकाश मड्डी,ओमप्रकाश जाधव यांच्यासह मान्यवरांनी रक्तदान केल.या वेळी बँकेचे सर्व कर्मचारी बँकेचे खातेदार मोठया संख्येने उपस्थित होते.
