Joint action by revenue and police on sand mafia : रेतीमाफियावर महसुल व पोलीसानी संयुक्त कारवाई; दोन बोट व उत्खनन करण्याचे साहित्य नष्ट

नांदेड| जिल्ह्यातील कुंटुर हद्दीत येणाऱ्या बरबडा वाडी येथील गोदावरी नदी पात्रातुन विनापरवाना बेकायदेशीर रित्या बोटीच्या सहाय्याने काळ्या रेतीचे उत्खनन केले जात असल्याच्या माहितीवरून महसुल विभाग व पोलीसानी संयुक्त कार्यवाही (Joint action by revenue and police on sand mafia) केली आहे. या कार्यवाहीत दोन बोट व उत्खनन करण्याचे साहित्य जिलेटीन काढयांच्या सहाय्याने नष्ट करण्यात आली आहेत. या कार्यवाहीने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.



याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपेरशन प्लश आऊट अंतर्गत नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफियांकडुन अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतुक संदर्भाने कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि.13/02/2025 रोजी वेळ मध्यरात्रीचे सुमारास नायगांव तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण एस. पाटील यांना मौ. बरबडा वाडी येथील गोदावरी नदी पात्रात विनापरवाना बेकायदेशीर रित्या बोट व इंजिनच्या सहाय्याने काळ्या रेतीची उत्खनन करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने बरबडा वाडी येथील गोदावरी नदीपात्राच्या ठिकाणी धडकले. यावेळी 03 बोट व इंजिनच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्राच्या पाण्यातुन काळया रेतीची उत्खनन करीत असतांना काहीजण आढळून आले.


महसुल व पोलीस अधिकारी आल्याचे पाहुन रेतीची उत्खनन करणारे एक बोट घेवुन फरार होतांना बोट पाण्यात बुडाली. मात्र रेतीचे उत्खनन करणारे पाण्यातुन पोहत नदीकाठी जावुन फरार झाले. या ठिकाणी अधिकाऱ्यांनी अंदाजे 25 लक्ष रुपये, उत्खनन करण्याचे साहित्य नायगावचे उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे उपस्थित जिलेटीन कांडयाच्या सहाय्याने नदी पात्राच्या काठालगत पाण्यात नष्ट केले आहे.



हि कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली, उप विभागीय अधिकारी क्रांती डोम्बे मॅडम, तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण एस. पाटील, महसुल विभागाचे मंडळ अधिकारी शितल स्वामी, पवार व इतर 10 ते 15 कर्मचारी, पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागोराव पोले, लक्ष्मण सोनकांबळे, पांडुरंग शिंदे, बाबु मुंडकर, अशोक घुमे, अंगद बान्हाळे आदींनी वाळू माफियांच्या विरोधात कार्यवाही यशस्वीपणे केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हाधीकारी राहू कर्डीले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच अवैध वाळू उपसा व वाहतुक करणाऱ्यावर भविष्यात अजुन कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.




