Friday, May 15

Nanded Police ; देशी दारुची वाहतूक करणारा ऑटोसह पोलीसांनी पकडला ; एक लाख वीस हजार रुपयेचा माल जप्त

उस्माननगर l अवैधरित्या देशी दारुचे बॉक्स ऑटोत टाकुन घेवून जात असतांना मंगळवारी रात्री सदरील ऑटोसह अवैध दारू चोरट्या मार्गाने मारतळा ते नरसी रोडवरील हातणी फाट्याजवळ पोलीसांनी पकडला.

उस्माननगर पोलीस स्टेशनचे सपोनी संजय निलपत्रेवार, फौजदार गजानन गाडेकर हे सोमवारी रात्री गस्तीवर असतांना एका ऑटोतून देशी दारु वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हातणी फाट्या जवळ पोलीसांनी बजाज कंपनीचा ऑटो क्र. एमएच २६ जी- ५२८४ हा थांबवून ऑटोची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारुचे नऊ बॉक्स पोलीसांना आढळून आले. पोलीसांनी ९० हजार रुपये किंमतीचा ऑटो व ३० हजार रुपये किंमतीची देशी दारु असा १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात निखील सुभाष शिंदे (वय १८), रा. हरबळ ता. कंधार याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!