राजकीयनांदेड

Manohar Dhonde sir ; आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करा – प्रा. मनोहर धोंडे सर – NNL

उस्माननगर | आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील मतदार राजांनी निवडणुकीत परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन सेवा जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा ,प्रमुख, उमेदवार प्रा.मनोहर धोंडे सर यांनी केले. माळाकोळी येथील प्रचंड जनसमुदायाची सभा ही विजयी सभा वाटते असे प्रतिपादन सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर यांनी माळाकोळी येथील प्रचंड जाहीर सभेत केले.

सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख तथा लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ६ ऑक्टोबर रोजी लोहा शहरातुन भव्य दिव्य अशी हजारोंच्या संख्येने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सदरील मोटारसायकल रॅली ही लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लोहा बायपास रोड असा रोड शो करुन लोहा,पोलेवाडी, खेडकरवाडी व्हाया माळाकोळी अशी काढण्यात आली या भव्य दिव्य हजारोंच्या संख्येने काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीने लोहा व कंधार मतदार संघातील जनतेचे लक्ष वेधले .

‘ एकच निर्धार प्रा. मनोहर धोंडे सर आमदार , सेवा जनशक्ती पार्टी चा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी लोहा शहर व परिसर दणाणले. तसेच माळाकोळी येथे माळाकोळी सर्कल येथील सेवा जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्याचा भव्य मेळाव्याचे ही आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखाराम तात्या केंद्रे होते . तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवा जनशक्ती चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर होते तसेच प्रमुख उपस्थिती सेवा जनशक्ती पार्टी चे प्रदेश प्रवक्ते विठ्ठलराव ताकबिडे,माजी पंचायत समिती सदस्य डॉ. दत्ता गवळी, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव पाटील भागानागरे, सेवा जनशक्ती पार्टी चे तालुकाध्यक्ष गोविंद हाबगुंडे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवेश्वर धोंडे,जनार्दन तिडके, हाब्बुभाई शेख, शेख हैदर भाई, कालीदास मुस्तापुरे, व्यंकटराव पवार, खेडकरवाडीचे सरपंच हनुमंतराव पाटील खेडकर, सरप़च कैलास धोंडे,गोविंदराव पाटील कांजले, बाबुराव मुस्तापुरे,आनंत नागरगोजे, अण्णाराव पाटील लांडगे, शिवसांब मुस्तापुरे, माजी सरपंच माधवराव घुगे, बालाजी एकलारे, उध्दा नाईक राठोड, महिला संघाच्या सौ.वर्षाताई देशमुख, अशोक शंकरे, रमेश राठोड, शिवाजी अंबेकर , हनुमंत लांडगे, शुभम घोडके,साधु पाटील वडजे, बालाजी एकलारे, पवन वाले, लक्ष्मण कांजले, प्रल्हाद पाटील घोरबांड ,आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर म्हणाले की,मी सर्व प्रथम लोहा येथून सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढली त्या सर्व सेवा जनशक्ती पार्टीच्या मावळ्यांचे स्वागत करतो. माळाकोळी येथील भव्य मिरवणूक ही बरीच वर्षांनंतर काढली. २०१४ मध्ये लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे आल्यावर काढली होती. तेव्हा येथे आमदार नांदेड चे माजी खासदार होते. तेव्हा मुंडे साहेब म्हणाले उघड्या जीप मध्ये केवळ मुंडे व धोंडे च राहतील. मी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचा स्नेही होतो. माळाकोळी सर्कल हे क्रांतिकारी विचारांच्या लोकांचे आहे. येथे जे घडते ते संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात घडते.

माळाकोळी येथील प्रचंड जनसमुदायाची सभा ही विजयी सभा आहे असे वाटते. आता हा आपला विजय कोणीही रोखू शकत नाही . आता पर्यंत येथे पाच सर्व्ह झाले त्या पाच ही सर्व्हे मध्ये आपण क्रमांक १ वर आहोत. आता आपल्याला कुणालाही तिकिट मागायचे नाही . आता पक्षच आपला आहे. आपण मागणारे नाही तर देणारे झालो आहोत. येथे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर केवळ ४ घराण्यांनी सता भोगली ती शिंदे, चिखलीकर , चव्हाण, धोंडगे यांनी व येथे बेकारी आणली आहे ती आपल्याला संपवायची आहे. यासाठी ३०० गावात अभियान चालू आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की,माझा समाज मागणारा नाही तर देणारा होईल ते क्रांतिकारी लोहा -कंधार मधुन होईल.

लोहा मतदार संघात २ लाख ९७ हजार मतदार आहेत. ३०० गावे ,२ नगर परिषद,साडेआठ सर्कल आहेत. ९१ तांडे ,६१ वाड्या आहेत तसा विचार केला तर ४० टक्के मतदार हे वाडी तांड्यावर आहेत पण येथे ४ टक्के ही विकास निधी आला नाही. मी आमदार झाल्यावर ४० टक्के निधी हा वाडी तांड्यांना देणार आहे. माळाकोळी – माळेगाव मार्ग रेल्वे धावणार आहे. येथे रोजगार मोठ्या प्रमाणात येणार आहे. तेव्हा सर्व मतदार बंधु भगिनींनी मला काम करण्याची संधी द्यावी असे सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमांचे प्रस्ताविक जगन्नाथ तिडके यांनी केले तर आभार गोविंद हाबगुंडे यांनी मानले.

अनेकांचा सेवा जनशक्ती पार्टी मध्ये पक्ष प्रवेश

सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा .मनोहर धोंडे सर यांच्या विकास कार्यावर प्रभावित होऊन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील माळाकोळी सर्कल मधील बंजारा बाधव रमेश राठोड देवला तांडा, बाबुराव चव्हाण, मारुती चव्हाण, विठ्ठलराव चव्हाण , हे सर्व राहणार गौंडगाव, गोविंद राठोड, तुळशीराम चव्हाण, लक्ष्मण राठोड सर्व राहणार केसुतांडा, गणेश चव्हाण, प्रकाश चव्हाण, दिलीप चव्हाण रा. सावरगाव, तसेच हिराबोरी येथील अंकुश चव्हाण, तसेच लोहा येथील वडार समाज संघटनेचे राजू जाधव यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांनी सेवा जनशक्ती पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे प्रा. मनोहर धोंडे सर यांनी पुष्पहार घालून स्वागत केले . यावेळी हजारो संख्येने कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button