Manohar Dhonde sir ; आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करा – प्रा. मनोहर धोंडे सर – NNL
उस्माननगर | आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील मतदार राजांनी निवडणुकीत परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन सेवा जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा ,प्रमुख, उमेदवार प्रा.मनोहर धोंडे सर यांनी केले. माळाकोळी येथील प्रचंड जनसमुदायाची सभा ही विजयी सभा वाटते असे प्रतिपादन सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर यांनी माळाकोळी येथील प्रचंड जाहीर सभेत केले.
सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख तथा लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ६ ऑक्टोबर रोजी लोहा शहरातुन भव्य दिव्य अशी हजारोंच्या संख्येने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सदरील मोटारसायकल रॅली ही लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लोहा बायपास रोड असा रोड शो करुन लोहा,पोलेवाडी, खेडकरवाडी व्हाया माळाकोळी अशी काढण्यात आली या ...
