नवीन नांदेड l सक्सेस कोचिंग क्लासेस सिडको नांदेड येथे स्कॉलर सर्च पूर्व परीक्षा दिनांमक 15 जून 25 रोजी घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल दिनांक 22 जून 25 रोजी जाहीर करून गुणवंताचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले.

गौरव गुणवंताचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपचे नेते विनोंद कांचनगिरे तर उद्घाटक माजी सनदी अधिकारी व शिक्षण प्रेमी शिक्षण हृदय सम्राट एकनाथरावजी मोरे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा टीचर्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष डी बी.शिंदे ,व सक्सेस कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा.गजानन मोरे प्रा. गादेकर,प्रा. गुट्टे ,प्रा. बासनुरे ,प्रा. जाधव प्रा. चव्हाण यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्येची देवता श्री सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,सर्वप्रथम सक्सेस अकॅडमी चे संचालक प्राध्यापक गजानन मोरे यांनी सक्सेस कोचिंग क्लासेसचे प्रस्ताविक केले,त्यावेळी त्यांनी स्कॉलर सर्च पूर्व परीक्षा हा एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवला कारण सिडको हा परिसर रोज मजुरी करणारा व सर्वसाधारण कुटुंब असणारा वर्ग जास्त आहे त्यामुळे येथील हुशार विद्यार्थ्यांना वाव देण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे.येथील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे हा उद्देश या मागचा होता.


माझी सनदी अधिकारी एकनाथराव मोरे यांनी मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा व उच्च दर्जाचे शिक्षण कसे प्राप्त होईल,याविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची उदाहरणे देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे,त्याचबरोबर शिक्षण सम्राट महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी मुलीसाठी पहिली शाळा 1848 मध्ये काढून मुलीसाठी शिक्षणाची दारे खुले करण्यात आले आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व सावित्रींना त्या सावित्रीबाई फुले मुळे आज यांना शिक्षणाची दारे खुले झालीअसल्याचे सांगितले.

डी.बी. शिंदे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साध्य करता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले व आम्हास सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात विनोदराव कांचनगिरे यांनी सिडको येथील नागरिकांना शैक्षणिक विकास कसा साध्य करता येईल.
तसेच औद्योगिक, सामाजिक, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रा. गादेकर यांनी स्कॉलर सर्च पूर्व परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप व त्यानंतर प्रत्येक वर्गातील गुनानुक्रमे येणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग व इतर 50 विद्यार्थ्यांना 50 टक्के फीस सवलत देण्यात आली. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी पालक व विद्यार्थी मध्ये अतिशय प्रचंड उत्साह व प्रतिसाद मिळाला.

