नवीन नांदेड l जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२०२५ अंतर्गत आयोजित मार्शल आर्ट कराटे या स्पर्धेत १४ ते १७ या वयोगटातून जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी, संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड या शाळेची विद्यार्थीनी माननी क्षीरसागर व सृष्टी मोतेवार यां विद्यार्थीनींना थांगता मार्शल आर्ट या खेळामध्ये स्टेट लेव्हल सिल्वर मेडल तर कराटे या खेळात सृष्टी मोतेवार या विद्यार्थीनीने गोल्ड मेडल तर मानीनी क्षिरसागर या विद्यार्थीनीने सिल्व्हर मेडल मिळविले.
तर सृष्टी मोतेवार या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये निवड झाली.तसेच युवराज पवार या विद्यार्थ्याची मल्लखांब या खेळात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
दरवर्षी प्रमाणे सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांत विद्यालयाने चांगले यश मिळविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव ,उपाध्यक्ष रवी जाधव मुख्याध्यापक साहेबराव देवरे ,पर्यवेक्षक विकास पाटील क्रीडा प्रमुख सुधीर मुदीराज व मुख्य लिपीक वसंत वाघमारे सर तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन या विद्यार्थिनीची कौतुक करण्यात आले.