नवीन नांदेड l संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमीत्त विष्णुपुरी येथे ग्रंथाची पालखी सोहळा निमित्ताने गावातुन मिरवणूक काढण्यात आली तर सकाळी हभप मधुसूदन महाराज कापसीकर यांच्या काल्याचा किर्तन व महाप्रसाद भंडारा आयोजन करण्यात आले होते,या सप्ताहाची सांगता हभप नंदकिशोर महाराज आदरसोडेकर परभणी यांच्या काल्याचा किर्तनाने होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने लक्ष्मण शक्ती, अखंड हरिनाम सप्ताह विष्णुपुरी येथे कै.मामासाहेब मारतळेकर, श्री रामजी ठाकूर महा राज मुख्य पुजारी, डॉ.हरजिंदर सिंघ बाबाजी दसमेस गुरूव्दारा विष्णुपुरी,सोमभारती महाराज , दत्तमंदिर, वंसतराव कुलकर्णी, नृसिहं मंदिर व्यवस्थापक ,यांच्या कृपा आशिर्वादाने विष्णुपुरी येथे 22ते 29 नोव्हेबर आयोजित करण्यात आले.
आहे.भागवत कथाकार हभप दिपक गुरू महाराज ठोणे पांगरेकर यांच्या सुमधुर वाणीतून 21ते27 नोव्हेंबर दुपारी 2 ते 5 यावेळेत आयोजित करण्यात आले होते.दैनंदिन काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, रामायण वाचन,हरिपाठ, हरि किर्तन आयोजन करण्यात आले होते.
या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये हभप भाऊसाहेब महाराज पावडेवाडी कर, बालाजी महाराज गुडेवार, परमेश्वर गुरूजी कंधारकर,सौ.मैनाताई महाराज लाठकर, बापुराव महाराज सौनखेडकर, यांच्ये दुपारी दोन ते तीन पुजेचे किर्तन लक्ष्मण शक्ती ग्रंथ सुरूवात झाली,तर 28 नोव्हेंबर रोजी सकाळी विष्णुपुरी गावातून मुख्य मार्गावरून ज्ञानेश्वर ग्रंथांची भव्य पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी महिला भागीनीनी मुख्य रस्त्यावर रांगोळी काढून आरती ओवाळून स्वागत करण्यात आले,तर सकाळी 10 ते 12या वेळात हभप मधुसूदन महाराज कापसीकर यांच्या काल्याचे किर्तन व महा आरती, महाप्रसाद भंडारा संपन्न झाला, यावेळी सरपंच सौ.संध्या राजु हंबर्डे, उपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अनिल हंबर्डे , उध्दव हंबर्डे यांच्या सह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रात्री हभप बाबु महाराज कांकाडीकर यांच्ये किर्तन आयोजित करण्यात आले आहे. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी हभप नंदकिशोर महाराज आदरसोडेकर यांच्ये काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार आहे.