उस्माननगर l नुकत्याच पार पडलेल्या व अतिशय लक्षवेधी ठरलेल्या कंधार लोहा विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर हे आमदार म्हणून प्रचंड मतांनी व दणदणीत विजय झाल्याबद्दल उस्माननगर परिसरातील गावा गावातील समर्थकांनी येथील चौकात एकत्र येऊन भव्य स्वागत केले.
नुकत्याच पार पडलेल्या अंत्यंत चुरशीच्या लढतीत विधानसभा निवडणुकीत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांनी निवडणुकीत तन मन लावून मेहनत घेऊन खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यकर्ता कामात व्यस्त होऊन , काहीही झाले तरी साहेब यावेळेस प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी मेहनत घेतली.
आणि तिसऱ्यांदा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले. काल २८ नोव्हेंबर रोजी गुरुवारी मतदार संघातील कार्यकर्त्याचे व मतदारांचे गाठीभेटी घेऊन आभार व्यक्त करण्यासाठी उस्माननगर येथील चौकात सकाळी अकरा वाजता नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर, प्रणिताताई देवरे -चिखलीकर , प्रविण पाटील चिखलीकर , जिवण पाटील घोगरे , यांच्या सह अनेक पदाधिकारी मान्यवराचे भव्य दिव्य, ढोलताशांच्या निनादात आणि फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सदस्य तथा ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम वारकड गुरूजी , सुरेश मामा बास्टे , साईनाथ पाटील कपाळे , माधवराव भिसे , बि आर.पाडागळे , शेषेराव पाटील काळम , शिवशंकर काळे , रूद्र (संजय)वारकड , बाबुराव पाटील घोरबांड , वैजनाथ पाटील घोरबांड , बाळू बास्टे , भुसेवाड , बालाजी रावण घोरबांड , सुमित देशपांडे ,भरत येडते , प्रदीप देशमुख , बी.पी.घोरबांड , आर आर पाटील घोरबांड , यांच्या सह शिराढोण , भुत्याचीवाडी , लाठ खु , हाळदा , सावळेश्वर , आलेगाव , दाताळा , नंदनवन , चिखली अदी गावातील प्रमुख कार्यकर्ते व मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व कार्यकर्ते व मतदार संघातील मतदार बंधू आणि भगिनींनीचे आभार मानले. व परिसरातील कामासाठी या. कोणाच्या शिफारशी घेऊन येत जावू नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
मतदार संघातील विकासासाठी सदैव तत्पर राहून कामे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. मारोती बी.घोरबांड यांनी सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन केले.