MLA Pratap Patil Chikhlikar ; नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे उस्माननगर चौकात भव्य स्वागत – NNL
उस्माननगर l नुकत्याच पार पडलेल्या व अतिशय लक्षवेधी ठरलेल्या कंधार लोहा विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर हे आमदार म्हणून प्रचंड मतांनी व दणदणीत विजय झाल्याबद्दल उस्माननगर परिसरातील गावा गावातील समर्थकांनी येथील चौकात एकत्र येऊन भव्य स्वागत केले.
नुकत्याच पार पडलेल्या अंत्यंत चुरशीच्या लढतीत विधानसभा निवडणुकीत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांनी निवडणुकीत तन मन लावून मेहनत घेऊन खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यकर्ता कामात व्यस्त होऊन , काहीही झाले तरी साहेब यावेळेस प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी मेहनत घेतली.
आणि तिसऱ्यांदा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले. काल २८ नोव्हेंबर रोजी गुरुवारी मतदार संघातील कार्यकर्त्याचे व मतदारांचे गाठीभेटी घेऊन आभार व्यक्त करण्यासाठी उस्माननगर येथील चौकात सका...
