नांदेड l रब्बी हंगामासाठी विष्णुपुरी धरणातून पाणी पली सोडण्यात यावी यासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित शेतकरी पुत्र आमदार आनंदराव बोंढारकर यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. यावेळी रब्बी हंगामासाठी तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या.
येत्या दोन दिवसात रब्बी हंगामासाठी पाणी सोडले जाईल अशी माहिती यावेळी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम शेतकरी पुत्र आमदार आनंदराव बोंढाराकर यांनी केले आहे. यावेळी कार्यकारी अभियंता गलधर, उपअभियंता संतोष नाईक, उप अभियंता शिवाजी नरमिटवार शाखा अभियंता उपस्थित होते.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विष्णुपुरी प्रकल्पातून पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी आ. आनंदराव बोंढारकर यांच्याकडे विनंती केली होती. या अनुषंगाने आ. आनंदराव बोंढारकर यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पाणी पाळी सोडण्याचे अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली .
कोणत्याही शेतकऱ्याला पाणी देण्यास पैसेसाठी अडवणूक करण्यात येऊ नये अशा सूचनाही यावेळी आ. आनंदराव बोंढारकर यांनी संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांची हित लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे .त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणत्याही बाबतीत शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशाराही आ. बोंढारकर यांनी यावेळी दिला.
शिवाय रब्बी हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पाणी पाळ्या वेळेत सोडाव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये रब्बी हंगामासाठी पाणी पाळी सोडली जाईल अशी माहिती यावेळी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंताने आयोजित बैठकीत दिली.
दरम्यान आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आनंदराव बोंढारकर यांची आजची पहिलीच बैठक शेतकरी हितासाठी पार पडली. शेतकरी पुत्र आमदार म्हणून आपल्या कार्याचा श्रीगणेशा शेतकऱ्यांच्या हिताच्या कामाने करता आला याबाबत आ. बोंढाराकर यांनी समधान व्यक्त केले.