HomeनांदेडCongress Committee ; मुळ मालकाच्या अनुपस्थित अभय योजना राबवुन घरे हस्तांतरीत करावी...

Congress Committee ; मुळ मालकाच्या अनुपस्थित अभय योजना राबवुन घरे हस्तांतरीत करावी ,अन्यथा मोर्चा वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्या ईशारा

नवीन नांदेड l मुळ मालकाच्या अनुपस्थितीत अभय योजना राबवून घरे हस्तांतरण करावी अन्यथा 2जुलै रोजी सिडको कार्यालय येथे मोर्चा काढण्याचा इशारा सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेश शिंदे व पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

नांदेड शहराच्या नियोजनबध्द विकासाकरीता 26-09-1975 रोजी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडको नांदेडची स्थापना करण्यात आली. सिडको ने नांदेड प्रकल्पा‌ अंर्तगत भौतिक सामाजिक सुविधासह आर्थीकदृष्ठया दुर्बल घटक अल्पउत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटाकरीता 04 गृहनिर्माण योजना राबविली. त्या अंर्तगत एकूण 7784 घरे बांधली. सदरील घरे 60/90 वर्षांकरीता दिर्घमुदतीच्या भाडेपट्याने लाभधारकांना देण्यात आली. सदर घरे मुळ वाटप धारकांनी सिडको ची पुर्व परवानगी न घेता, परस्पर पब्लीक नोटरी अथवा मुद्रांकावर खरेदी विक्री चा व्यवहार करून घराचा ताबा खरेदीदारास दिलेला आहे.

सिडको मंडळाचा ठराव क्रं. 9205 दि. 02-05-2005 रोजी. नांदेड प्रकल्पास मुळ मालंकाच्या अनुपस्थित अटी व शर्तीस आधीन राहून घरे हस्तांतरण करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार 278 घरे हस्तातरीत करण्यात आली आहेत. सदरील घरे खरेदी दाराच्या ताब्यात असून ती घरे सिडको करून हस्तांतरीत करूण मिळावीत अशी आमची अनेक वर्षापासून सिडको नांदेड येथील नांगरीकांची मागणी आहे.

सिडकोच्या नवीन नांदेड प्रकल्पातील वाटप केलेली घरे मुळ मालंकानी बाँडवर विक्री केल्यानंतर मुळ मालंकाच्या अनुपस्थितीत सदर घरे हस्तांतरण करणे या संदर्भात अभययोजना राबवीने तसेच इतर अनुषंगीक बाबींसदर्भात शिफारशी शासनास सादर करण्यासाठी सहव्यवस्थापक संचालक 2 सिडको यांच्या अध्यक्षतेखाली 07-04-2025 रोजी राज्यशासनाने समीती गठीत केली. त्यात प्रमुख्याने 1 सहव्यवस्थापक सिडको अध्यक्ष 2 जिल्हाअधिकारी नांदेड सदस्य 3 आयुक्त नांदेड मनपा सदस्य 4 विषयाशी संबंधीत तजव्यक्ती 5 मख्य प्रशासक सिडको छत्रपती संभाजीनगर सदस्य सचिव या सदस्यांना 2 महीन्यात अहवाल सादर करावा अशी विनंती केली होती.

तरी अद्याप पर्यंत कसल्याच प्रकारची कार्यवाही केलेली नसल्याने समीतीने लवकरात लवकर अहवाल शासनास सादर करावा व नागरीकांना न्याय द्यावा,अन्यथा दि. 02-07-2025 सकाळी 10 वाजता. सिडको कार्यालायावर भव्य मोर्चा कढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला महेश शिंदे, प्रवक्ते बापुसाहेब पाटील, अध्यक्ष युवक काँग्रेसचे प्रेसनजीत वाघमारे,शेख मोहमदीन साब, भगवान जोगदंड,लतीफ शेख,युसूफ शेख, देविदास कदम यांनी दिला असून या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड,मनपा आयुक्त, मुख्य प्रशासक छत्रपती संभाजी नगर, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन येथे देण्यात आल्या आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments