Success Coaching Classes ; सक्सेस कोचिंग क्लासेसच्या गौरव गुणवंताचा बक्षीस वितरण सोहळ्यास विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती
नवीन नांदेड l सक्सेस कोचिंग क्लासेस सिडको नांदेड येथे स्कॉलर सर्च पूर्व परीक्षा दिनांमक 15 जून 25 रोजी घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल दिनांक 22 जून 25 रोजी जाहीर करून गुणवंताचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले.
गौरव गुणवंताचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपचे नेते विनोंद कांचनगिरे तर उद्घाटक माजी सनदी अधिकारी व शिक्षण प्रेमी शिक्षण हृदय सम्राट एकनाथरावजी मोरे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा टीचर्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष डी बी.शिंदे ,व सक्सेस कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा.गजानन मोरे प्रा. गादेकर,प्रा. गुट्टे ,प्रा. बासनुरे ,प्रा. जाधव प्रा. चव्हाण यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्येची देवता श्री सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,सर्वप्रथम सक्सेस अकॅडमी चे संचालक प्राध्यापक गजानन मोरे यांनी सक्सेस कोचि...
