HomeनांदेडMLA Prataprao Patil Chikhlikar : लोहा शहरातील गोरोबाकाका मंदिर सभागृह व आशु...

MLA Prataprao Patil Chikhlikar : लोहा शहरातील गोरोबाकाका मंदिर सभागृह व आशु खाना डोलासाठी निधीं देणार- आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

लोहा| निवडणूक आली की लोक पैसे घेऊन येतात. आम्हाला वाट्टेल ते बोलतात. पण या शहरातील जनतेनी मला व माझ्या सहकार्यावर विश्वास ठेवला आहे .शहराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत शहरातील जनतेनी नेहमीच साथ दिली आहे. यापूढे आपला असाच आशीर्वाद राहावा. तसेच गोरोबाकाका मंदिर सभागृहात तसेच आशु खाना डोला सभागृह यासाठी निधी देण्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आश्वासित केले.

लोहा शहरातील जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर जुन्या शहरातील गोरोबाकाका मंदिर परिसरात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संवाद साधला यावेळी माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माणिकराव मुकदम, आयोजक करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, पंचशील कांबळे, जीवन चव्हाण, सचिन मुकदम, ऋषी पाटील मोरे बाबुराव डोम,नामदेव पवार ,तालुकाध्यक्ष छत्रपती स्वामी, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, माजी नगरसेवक भास्कर पाटील पवार सलीम पटेल, इमाम लदाफ,माजी पाणीपुरवठा सभापती अप्पाराव पवार, शहराध्यक्ष रामराव पवार, यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

lo 1 MLA Prataprao Patil Chikhlikar : लोहा शहरातील गोरोबाकाका मंदिर सभागृह व आशु खाना डोलासाठी निधीं देणार- आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी लोहा शहरातील जनतेनी नेहमीच साथ दिली आहे. काहीजणांचे माळेगाव यात्रेतील दुकाने असतात .यात्रा संपली की पाल उठतात तशीच याची दुकाने असतात. मी व आमचे सहकारी नेहमीच आपल्या सुखदुःखात असतो .निवडणूक कोणतीही असो तुमची खंबीरपणे साथ मिळाली आहे. लोकांत जाणारे करीम भाई सारखे नगरसेवक तुम्ही निवडून देता याच प्रभागातून कल्पनाताई मुकदम यांनाही निवडून दिले. असे सांगून या मंदिराच्या सभामंडप तसेच आशु खाना डोला मंडप यासाठ निधी देण्याचे आश्वासित केले यावेळी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माणिकराव मुकदम यांची भाषणे झाली. प्रास्ताविक भास्कर पवार यांनी केले तर संचलन व आभार शिवराज दाढेल यांनी केले.

कलाल पेठ, माऊलीनगर, राजाराम नगरात भूमिपूजन
लोहा शहरातील जवळपास सव्वा कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आ प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कलाल पेठ भागात सीसीरोड , भवानी माता मंदिर, नाले हैदर आशु खाना सभामंडप याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी माणिकराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, करीम शेख, पंचशील धुतमल, माधवराव धुतमल, सोमनाथ महाबळे, इमाम लदाफ, निहाल मसुरी, प्रवीण धुतमल, सचिन मुकदम, विठ्ठल महाबळे सदा धुतमल, भारत महाबळे,सोशल मीडिया रील स्टार सलिम शेख, इस्माईल देवकर, विलास तेलंग, रहेमान बागवान , शंकर वट्टमवार, यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments