Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत मारतळा येथील युवक जागीच ठार

उस्माननगर, माणिक भिसे l शेताकडून गावाकडे रस्ता ओलांडणाऱ्या एका युवकास भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना दि.१२ एप्रिल रोज शनिवारी सकाळी सातच्या दरम्यान नांदेड – हैदराबाद राज्य महामार्गावरील मारतळा गावाजवळ घटना घडली .या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात त्या फरार अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला आहे.

मारतळा येथील रहिवासी असलेला प्रथमेश शिवाजी इर्लेवाड वय १८ वर्ष याचे शेताकडून गावाकडे येत असताना नांदेड – हैदराबाद महामार्गावरील मामासाहेब महाराज यांच्या समाधी मंदिरात लगत रस्ता ओलांडताना भरधाव अज्ञात वाहनाने

इर्लेवाड यास धडक दिली. या दुर्दैवी अपघातात तो जागीच ठार झाला. यानंतर ही माहिती उस्माननगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी इन्केस्ट पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते . फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. ऐन श्री हनुमान जन्म ोत्सव दिनी ही दुर्दैवी घटना घडली असून मयत प्रथमेश इर्लेवाड हा आपल्या आई वडीलास एकुलता एक पुत्र होता.

वडील शिवाजी इर्लेवाड हे रापम एसटी महामंडळाच्या बिलोली आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने इर्लेवाड परिवारावर दुः खाचा डोंगर कोसळला असून गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button