Wednesday, May 13

Tag: Youth from Martala dies on the spot after being hit by unknown vehicle

Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत मारतळा येथील युवक जागीच ठार

Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत मारतळा येथील युवक जागीच ठार

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l शेताकडून गावाकडे रस्ता ओलांडणाऱ्या एका युवकास भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना दि.१२ एप्रिल रोज शनिवारी सकाळी सातच्या दरम्यान नांदेड - हैदराबाद राज्य महामार्गावरील मारतळा गावाजवळ घटना घडली .या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात त्या फरार अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला आहे. मारतळा येथील रहिवासी असलेला प्रथमेश शिवाजी इर्लेवाड वय १८ वर्ष याचे शेताकडून गावाकडे येत असताना नांदेड - हैदराबाद महामार्गावरील मामासाहेब महाराज यांच्या समाधी मंदिरात लगत रस्ता ओलांडताना भरधाव अज्ञात वाहनाने इर्लेवाड यास धडक दिली. या दुर्दैवी अपघातात तो जागीच ठार झाला. यानंतर ही माहिती उस्माननगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी इन्केस्ट पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते . फरार झालेल्य...
error: Content is protected !!