Illegal Sand Mining : अवैध रेती उत्खनन करणारे साहित्य नष्ट नांदेड महसूल पथकाची कारवाई; 63 लाख किंमतीचा मुद्देमाल नष्ट

नांदेड| आज 29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी, मनोज जाधव, माधव भिसे, बरोडा श्रीरामे, जमदाडे, मनोज सरपे, महेश जोशी, महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे या महसूल पथकाने विष्णुपुरी परिसरामध्ये पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना रेती उत्खनन करणारे 2 मोठ्या बोटी, एक छोटी बोट व 4 इंजिन आढळून आले.

या पथकाने मजुरांच्या साह्याने 3 बोटी व 4 इंजिन जिलेटीने स्फोट करून नष्ट केले. तसेच 30 तराफे जाळून नष्ट केले, असे एकूण 63 लाख किंमतीचा मुद्देमाल जाग्यावरच स्फोट करून नष्ट केला. एक अवैध वाहतूक करणारी हायवा एमएच 26 बीसी 4892 जप्त करून तहसील कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आला आहे. सदर हायवावर दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची तजवीच करण्यात आली आहे.

या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व पोलीस जमादार शिंदे, श्री. घुगे व श्री. जाधव यांचे पोलीस पथक उपलब्ध करून दिले. अवैध उत्खनना संदर्भात नांदेड महसूल प्रशासन सक्तीने कारवाई करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button