Sunday, May 17

Demand ; नशेच्या गोळ्या विकणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी

नांदेडl नांदेड शहरात काही भागात मेडिकल स्टोर्सवर नशेच्या गोळ्या सर्रासपणे विक्री होत असून अशा दुकानदारांविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शीख समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. गुरुद्वारा भोवतालच्या काही रस्त्यांवर असलेल्या काही औषधि दुकानावर असले प्रकार घडत आहेत.

वरील विषयी सामाजिक कार्यकर्ता तेजपालसिंघ खेड, स. मोहन सिंघ गाडीवाले, विजयेंद्रसिंघ दफेदार, अमनसिंघ ग्रंथी, विक्रमसिंघ फौजी, पवितरसिंघ हजुरी, कुलदीपसिंघ सिद्धू, कारणजीतसिंघ शाहू, सुखविंदरसिंघ, सुरेंदरसिंघ कापसे, अमरजीतसिंघ भट्टी, क्रिष्णासिंघ सहाने, राजसिंघ टाक व अमरप्रीतसिंघ फौजी व इतर युवकांनी पुढाकार घेतला आहे. वरील युवकांनी नांदेडचे जिल्हाधिकारी साहेब, औषधि व अन्न प्रशासन विभागाच्या निदर्शनात वरील विषय प्रस्तुत केला आहे. तसेच नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांची देखील भेट घेण्याचे ठरले आहे.

विशेष बाब म्हणजे, परवा पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठक मध्ये, नांदेडचे खासदार श्री रवींद्र चव्हाण यांनी शहरात अमली पदार्थंची विक्री होत असल्याचे आरोप केले होते. नांदेडचे लोकसभा खासदार रवीन्द्र चव्हाण यांनी हा मुद्दा प्रस्तुत केल्यामुळे संबंधित विषयास गांभीर्य प्राप्त झाले आहे.

नांदेड शहरात वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार सुरु आहे. गुरुद्वारा भोवतालच्या काही भागात तसेच भगतसिंघ मार्ग, जूना मोंढा, गुरुद्वारा चौक, नगीनाघाट मार्ग येथे ट्रक चालक, मजूर वर्ग, परप्रांतीय लोकं आणी विद्यार्थ्यांकडून अमली पदार्थ / गोळ्या इत्यादिची खरीदी करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार परेगा, नायट्रोसीन, लिमोटीन, लीप्रेस सारख्या गोळ्याचे सेवन व्यसन करण्या साठी केले जात आहे. नांदेडमध्ये बाहेरून अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर शिक्षणासाठी असंख्य विद्यार्थी राहत आहेत. काही विद्यार्थी अशा व्यसनाला बळी पडत आहेत. यामुळे पुढे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मादक पदार्थांची विक्री करणाऱ्या नांदेड शहरातील औषध विक्रेत्यांचा शोध घेवून पोलीस प्रशासन आणी औषधि व अन्न प्रशाषण विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!