HomeकृषीFarmers should apply : शेतकऱ्यांनी कृषि समृद्धि योजनेतील विविध घटकांसाठी अर्ज करावेत-...

Farmers should apply : शेतकऱ्यांनी कृषि समृद्धि योजनेतील विविध घटकांसाठी अर्ज करावेत-  जिल्हा अधिक्षक कृ‍षी अधिकारी

नांदेड| कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणुक वाढवून पायाभुत सुविधा निर्माण करणेउत्पादन खर्च कमी करणेउत्पादकता वाढविणेपिक विविधीकरणमुल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषि समृध्दी योजना सन 2025-26 पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 

या योजनेअंतर्गत उत्पादकताशाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये हवामान अनुकूल बियाणेपिकांचे वैविध्यजमिनीची सुपीकता व्यवस्थापनयांत्रिकीकरण व मजबूत मूल्य साखळी तयार करण्यावर भर दिला जात आहे. याशिवायडिजीटल शेतीकाटेकोर शेतीयंत्रसामुग्री सेवाकृषिगोदामप्रक्रिया व निर्यात यावर तसेचशेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी विविध योजना व उपक्रमांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन देणेसाठी नियोजन केलेले असुन यासाठी शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभणे अपेक्षीत आहे.

या योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनुदानीत घटकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या घटकातील देय अनुदान प्रमाण व मर्यादा लागु राहणार असुन प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) देण्यात येणार आहे. ही योजना डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीव्दारे राबविण्यात येणार असुन योजनेंतर्गत शेतकरी /महिला गटउत्पादक कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येत आहे. अल्पअत्यल्प भुधाकरक, महिला शेतकरीअनुसूचित जातीजमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील. या प्राधान्यक्रमाचा महाडिबीटी प्रणालीमध्ये समावेश असल्याने कृषि विभागाच्या https://mahadbtmaharashtra.gov.in/farmer या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज

करावेत.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयनांदेड अधिनस्त तालुका कृषि अधिकारी यांना कृषि समृद्धी योजनेमध्ये विविध घटकांसाठी लक्षांक प्राप्त झालेला असुन केंद्र व राज्य शासनाकडील सद्स्थितीत असलेल्या योजनांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेमध्ये लाभार्थी निवड तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करुन प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार केली जाणार आहे. या योजनेमध्ये समाविष्ट घटक म्हणजेचएकात्मिक खत व्यवस्थापन अंतर्गत प्रोम खते प्रोत्साहन योजना, प्राथमिक प्रक्रिया अंतर्गत बीज प्रक्रिया संच स्थापन करणेकिसान ड्रोन योजनाजैविक निविष्ठा संसाधन केंद्र (बी आर सी ( स्थापन करणेकाढणे पश्चात व्यवस्थापन अंतर्गत गोदाम बांधकाम योजना शेतमाल विक्रीसाठी फिरते वाहन विक्री केंद्र सुविधा योजनापीक प्रात्यक्षिक चिया पीकपीक प्रात्यक्षिक मका पीककॉटन श्रेडर इत्यादी घटकांसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments