Nanded ; नांदेड तालुक्यातील 73 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहिर

नांदेड l नांदेड तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवारी तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी यांच्या बैठक कक्षात जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, सामान्य उपविभागीय अधिकारी अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे शांततेत पार पडली. तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीपैकी ३७ग्रामपंचायतीवर महीलांना सरपंच पदाची संधी उपलब्ध होणार आहे.


अनुसूचित जातीसाठी तालुक्यात असलेल्या १८ ग्रामपंचायतीपैकी राहेगाव, मार्कंड, पोखर्णी, खुपसरवाडी, कोटतीर्थ, धानोरा, पिंपरी महिपाल, नाळेश्वर, जैतापूर या ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे तर अनुसूचित जाती महिलांसाठी गाडेगाव, बाभूळगाव, पुयणी, नागापूर / सस्तापूर, किकि, वाजेगाव, सुगाव बु, भनगी, आदी ठिकाणी बळीरामपूर आदी महिलांसाठी सरपंच पदाचे आरक्षण राखीव आहे. तरअनुसूचित जमातीसाठी असलेल्या गोपाळचावडी ही ग्रामपंचायत सुध्दा महिलांसाठी राखीव आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गातील २० पैकी चिखली बु, वडवना/खडकी, निळा, खडकूत एमशेटवाडी, वडगाव, आलेगाव, कामठा खुर्द, सुगाव खुर्द, गंगाबेट, लिंबगाव आदी ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षण राखवी ठेवण्यात आले आहे. तर महिलांसाठी नेरली, फत्तेपूर इलिचपूर सिध्दनाथ, धनेगाव/मुजामपेठ, पिंपळगाव नि., बोंढार ने,वानेगाव-वरखेड-भानपूर, पांगरी, कासारखेडा, वाडी बू. आदी ग्रामपंचायतीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदाचे आरक्षण महिलांसाठी राखीव आहे.


तर खुल्या प्रवर्गातील ३४ पैकी नांदुसा / भालकी, इंजगाव, विष्णुपूरी, एकदरा, ब्राम्हणवाडा, चिखली खू, तळणी, गुंडेगाव, थुगाव, खुरगाव, भायेगाव, पासदगाव/तर्फे काकांडी, दर्यापूर, सायाळ, वाहेगाव, पिंपळगाव, मिश्री, बोरगाव तेलंग आदी ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे तर महिलांसाठी मरळक बु. मरळक खुर्द, वांगी/वाडी करडेल, चिमेगाव, ढोकी, त्रिकुट/वाडी झांजी, कल्लाळ, सोमेश्वर, रहाटी बु, बोंढार तर्फेहवेली, तुप्पा, वाडी पुयड, पुणेगाव, काकांडी उर्फ तुप्पा, वाघी, धनगरवाडी, नसरतपूर/हस्तापूर, पिंपळगाव कोरका आदी ग्रामपंचायतीवर खुला प्रवर्ग महिला संरपंच पदासाठी आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दिली आहे. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू निवासी नायब तहसीलदार स्वप्नील दिग्गलवार, इंद्रजित गरडकर, महसूल अधिकारी देविदास जाधव आदींसह विविध गावातील सरपंच, जि. प. सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




