Tuesday, June 30

Police Action ; वाजेगाव मुदखेड रोडच्या ब्रिजखाली दोन जणांना अटक, तलवार व मोटार सायकल जप्त

नवीन नांदेड l पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध शस्त्र बाळगुन फिरणारे लोकांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्यावरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी कार्यवाही करत हद्दीत वाजेगाव मुदखेड रोडवरील ब्रिजखाली मोटार सायकवरील दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून तलवार व मोटार सायकल जप्त केली आहे.

दिनांक 01/07/2025 रोजी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नदिड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकाचे पोउपनि, ज्ञानेश्वर मटवाड व त्यांची टिम पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत गुन्हेगार वाँच पेट्रोलींग करीत होते. दरम्यान त्यांना खबऱ्या मार्फत गोपनीय माहीती मिळाली की, दोन इसम एका मोटार सायकलवर वाजेगाव बायपास ब्रिजखाली मुदखेड रोडवर थांबले असुन, ते सोबत तलवार बाळगुन आहेत. या इसमावर पोलीस स्टेशन मुदखेड येथे खून, खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असून ते सध्या जामीनावर असून ते कोणता तरी गंभीर गुन्हा करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी वेळ 15.15 वाजता गुन्हे शोध पथकाने छापा कारवाई केली. यावेळी आरोपीतांकडून एक लोखंडी तलवार व गुन्हा करण्यासाठी वापरत असलेली मोटार सायकल असा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला. आणि संतोष मारोतराव पवार वय 35 वर्ष, पोलीस अंमलदार पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण फिर्यादी वरुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोहेकों केंद्रे,पचलींग,पोकों पवार,कल्याणकर, आवळे नेमणूक पोलीस स्टेशन नदिड ग्रामीण व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!