Shiva Sadguru Shivlinga Swami Dutt Temple – शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त मंदिर संस्थान पिंपळगावला राज्य सरकारचे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता -NNL

नांदेड| जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले, प्रसिद्ध देवस्थान शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी श्री दत्त मंदिर संस्थान पिंपळगाव ता.हदगाव या देवस्थानला राज्य सरकारने ब दर्जाचे तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर केला आहे.

याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री, तथा नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते भागवत देवसरकर यांनी सतत पाठपुरावा करत ब दर्जा मंजूर करून घेतला आहे.

ब दर्जा तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून मंदिराचा, परिसराचा राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होणार आहे. परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात मंदिरात येणार्‍या भाविकांना सुख-सुविधा मिळणार आहेत. राज्य सरकारचे व ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांचे परिसरातील भाविकांच्या व नागरिकांच्या वतीने भागवत देवसरकर यांनी आभार मानले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button