Arunkumar jain : अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची पाहणी केली -NNL

नांदेड। अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागाची आज म्हणजेच 08 ऑगस्ट 2024 रोजी पाहणी केली. श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी संपूर्ण तपासणी दरम्यान त्यांच्यासोबत उपस्थित होते.

अरूण कुमार जैन यांनी मालटेकडी – नांदेड दरम्यान रेलवे लाइनची तपासणी केली. त्यांनी नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयास भेट देऊन हरित पर्यावरणासाठी रोपे लावली. महा व्यवस्थापक यांनी डीआरएम कार्यालयात अधिकाऱ्यां सोबत आढावा बैठकही घेतली. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन नांदेड विभागाशी संबंधित विविध रेल्वे विकास कामांबाबत निवेदन सादर केले.

 

पुढे, महाव्यवस्थापकांनी नांदेड येथील कोचिंग डेपोची पाहणी केली, जिथे त्यांनी कोच देखभाल सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी डब्यांची सविस्तर पाहणी केली आणि चार्जिंग पॉइंट, टॉयलेट, इलेक्ट्रिकल पॉइंट इत्यादींच्या देखभालीचा आढावा घेतला. त्यांनी पिट लाइनवरील देखभाल दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी डेपोमध्ये ‘750 डब्ल्यू फीडर टेस्ट किट’चे उद्घाटनही केले.

श्री अरुण कुमार जैन यांनी कोचिंग डेपोमधील पर्यवेक्षक आणि सुरक्षा श्रेणी कर्मचाऱ्यांसह संवादात्मक सत्रात भाग घेतला. सत्रादरम्यान, आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या शंका आणि समस्यांचे महाव्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी निराकरण केले. नंतर, महाव्यवस्थापकांनी नांदेड रेल्वे स्थानकावर 500 Kld सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button