नांदेड| शहरात दोन्ही रस्त्याच्या मध्यभागात असलेल्या लाईटच्या पोलवर मर्यादित जागेच्या लहान आकाराच्या फ्लेक्सची परवानगी असतेवेळी संबधित अॅडव्हरटायर्झसच्या वतीने मोठ-मोठ्या आकाराचे फ्लेक्स लटकावून नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात असून या प्रकारामुळे रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच विचित्र अपघातांना निमंत्रण देण्याचा प्रकार असल्याचे चित्र दिसून येते आहे.


मागील चार मही्न्यांपूर्वीच मुंबईत १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे मुंबईच्या घाटकोपर परिसरात एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आणि यात १४ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ७५ पेक्षा अधिक लोक यात जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेमुळे मुंबईतल्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातील मोठमोठ्या आणि अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला होता तो आता काहीसा बाजूला पडला असे वाटू लागले आहे आणि संबधित अॅडव्हरटायर्झसच्या अधिकच्या आकाराच्या होर्डींगवर नगरपालिका व जिल्हा प्रशासना लक्ष वेधून कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून होत आहे. दरम्यान होर्डिंग कोसळून लोक मृत्यूमुखी पडल्याची काही पहिली घटना नाही. याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. पुण्यातही आतापर्यंत तीन होर्डिंग कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण मुंबईत घडलेली घटना मृत्यूंची संख्या पाहता मोठी आहे.

परवानगी नसलेलं हे अधिक क्षमतेचं होर्डिंग लावण्यास कोणी परवानगी दिली आणि याला जबाबदार कोण ?
नांदेड शहराच्या चहू बाजूने परवानगीपेक्षा अधिक मोठ्या आकाराचे होर्डींग उभे करून महापालिकेचा महसूल व अपघातांना निमंत्रण अशा दोन्ही बाजूंनी सामान्य जनता मात्र त्रस्त असे चित्र दिसून येत आहे याबाबत अधिकची माहीती घेतली असता महापालिकेच्या वतीने संबधित जाहीरात एजन्सीला सेंट्रल पोलिंग फ्लेक्स साठी फक्त ३ बाय ४ आकाराची परवानगी असतांना त्याठिकाणी ४ बाय १२ पर्यंतचे फ्लेक्स धोकादायक रित्या लटकाविले जात आहेत तरी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून सदरील प्रकाराला आळा घालावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
