लोहा। लोहा कंधार तालुक्यात शेकडो एकर जमीन सिंचनाखाली आली ते लिंबोटी धरण माझ्या पहिल्या आमदारकीच्या टर्म मध्ये पूर्णत्वास गेले तसेच नॅशनल हायवे निर्माण झाला.नांदेड लोहा लातूर या प्रलंबित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याची मंजुरी मी खासदार असताना मिळाली.अनेक कामे करता आली.पुढील काळात आपण लोहा मतदार संघाच्या विकासाचा वादा करीत आहोत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना महायुती कटिबद्ध आहोत असा विश्वास प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला
लोहा शहरातील जिजामाता फँक्शन हॉल मध्ये भरगच्च पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण स्क्रीन वर लावण्यात आले होते तत्यानंतर पत्रकार परिषदेत प्रतापराव पाटील चिखलीकर,पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी प्रदेश उपाध्यक्ष ,वसंत सुगावे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम , बाबुराव केंद्रे उमरगेकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे,करीम शेख, केशवराव मुकदम , दता वाले तालुकाध्यक्ष मनोहर भोसीकर छत्रू महाराज ,मिलिंद पवार यासह मान्यवर उपस्थित होते.
मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असे सांगताना प्रतापरावांनी लिंबोटी धरण पूर्णत्वास नेले,छत्रपती शिवरायांचा व महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा उभारणी तीर्थक्षेत्र विकास, राष्ट्रीय महामार्ग उपजिल्हा रुग्णालय, हाजीसाय सरवरे दर्गा विकास बुद्ध विहार, शादी खाना उभारणी निधी, यासह अनेक कामे व निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले तसेच आगामी काळात मतदार संघाचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला.
कँसर हॉस्पिटल, उद्योग ,सिचन, रस्ते युवकांसाठी अद्यावत अभयसिक, क्रीडा संकुल असा अनेक विकास योजनांचा वादा त्यांनी जाहीर केला आपले कोणीच शत्रू वा विरोधक नाही असे सांगून मतदार निश्चितच विजयी करणार आहेत असा आत्मविश्वास व्यक्त केला पत्रकारांच्या प्रश्नांना अतिशय समर्पक व कोपरखळ्या मारत उत्तरे दिली. भास्कर पवार यांनी संचलन व आभार मानले.