नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीचे पुर्वतयारी अनुषंगाने व (Operation flush out) अंतर्गत अवैद्य व्यवसायांना आळा घालण्यासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी व पोनि स्थागुशा यांना नांदेड जिल्हयात दिनांक 04.11.2024 रोजी 05.00 वा. ते 09.00 वाजेदरम्यान कोंम्बींग ऑपरेशन राबविण्यासाठी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदर कॉम्बींग ऑपरेशन मध्ये स्वतः अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी भाग घेतला असुन, त्यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड जिल्हा, मा. श्री. उदय खंडेराय, पोनि स्थागुशा, सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार, स्थागुशा अंमलदार यांनी वरील प्रमाणे नांदेड जिल्हयात कॉम्बींग ऑपरेशन राबवून वरील प्रमाणे कारवाई केली आहे.