
नवीन नांदेड l श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथे साहित्यिक व इंग्रजीचे गाढे अभ्यासक डॉ.दुर्गेश रवंदे प्राचार्यपदी रूजू झाले आहेत.


प्राचार्य डॉ. रवंदे यांच्या नियुक्ती बदल आयोजित सत्कार सोहळ्यात म्हणाले की,विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचे आहे,विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थी आहोत म्हणून आपण आहोत,आपल्या पुढील आव्हाने खूप आहेत पण विद्यार्थ्यांपुढे आपण काय घेऊन जातो आणि त्यांना काय देतो हे फार महत्त्वाचे आहे.अध्यापनामुळे महाविद्यालयात नवचैतन्य निर्माण होते, त्यामुळे आपल्यालाही जीवन आनंददायी अनुभव येईल. अध्यापकांनी अध्यापन सोबतच संशोधन प्रकल्प मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

पाहिजे.संशोधन प्रकल्प आपल्या महाविद्यालयाचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करते. एखादी गोष्ट जर करणं भागच असेल तर त्यात रस घेऊन केला तर ते काम अधिक सुंदर होईल. गुणवत्ता ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.हे टीम वर्क आहे, एकट्याने प्रगती होत नाही.आपण सगळ्यांनी मिळून महाविद्यालयास गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करूयात असे प्रतिपादन केले.


अध्यक्षीय समारोप करताना डॉ.बाबुराव घायाळ यांनी महाविद्यालयाचा विकास अहवाल सभागृहात ठेवला.याप्रसंगी डॉ.लक्ष्मण काळे, डॉ.विशाल मस्के,डॉ.शंकर विभुते,डॉ.सौदागर,डॉ.शिवराज देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ हनुमंत भोपाळे यांनी तर आभार डॉ.भागवत पस्तापुरे यांनी मानले.

निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,व विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, उपाध्यक्ष माजी आमदार अमिता ताई चव्हाण,संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षण राज्यमंत्री डी.पी.सावंत, सहसचिव प्राचार्य रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष मा.उदयराव निंबाळकर,श्री नरेंद्र चव्हाण, आ.श्रीजयाताई चव्हाण यांच्यासह कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



