Indira Gandhi College ; डॉ.दुर्गेश रवंदे इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रूजू
नवीन नांदेड l श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथे साहित्यिक व इंग्रजीचे गाढे अभ्यासक डॉ.दुर्गेश रवंदे प्राचार्यपदी रूजू झाले आहेत.
प्राचार्य डॉ. रवंदे यांच्या नियुक्ती बदल आयोजित सत्कार सोहळ्यात म्हणाले की,विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचे आहे,विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थी आहोत म्हणून आपण आहोत,आपल्या पुढील आव्हाने खूप आहेत पण विद्यार्थ्यांपुढे आपण काय घेऊन जातो आणि त्यांना काय देतो हे फार महत्त्वाचे आहे.अध्यापनामुळे महाविद्यालयात नवचैतन्य निर्माण होते, त्यामुळे आपल्यालाही जीवन आनंददायी अनुभव येईल. अध्यापकांनी अध्यापन सोबतच संशोधन प्रकल्प मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
पाहिजे.संशोधन प्रकल्प आपल्या महाविद्यालयाचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करते. एखादी गोष्ट जर करणं भागच असेल तर त्यात रस घेऊन केला तर ते काम अधिक सुंदर होईल...
