huge response to 1008 Shri Gurucharitra Saramrit Parayana नांदेड| गुरुतत्त्व प्रदीप नांदेड आयोजित 1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व श्री गुरुचरित्र कथामृत सप्ताहास आज भक्ती लॉन्स मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून जवळपास 2100 पुरुष महिला यांनी श्री गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. सदरील पारायण व कथामृत सप्ताहास प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. दक्षिणगंगा गोदावरी मातेच्या नाभीस्थानी वसलेल्या व संत मंहंताच्या वास्तव्याने पवन झालेल्या नांदेड नगरीमध्ये 11 पारायणाच्या मालिकेतील आठवे पुष्प आयोजित करण्यात आले आहे.


धकाधकीच्या काळातही श्री गुरुचरित्राची नितांत गरज असल्याकारणाने सर्व कडक नियमांना शिथिलता देऊन सर्व समाजातील स्त्री-पुरुषांना वाचता येण्याकरता या ग्रंथाची निर्मिती करून घेण्यात आली आहे. नांदेडच्या गुरुतत्त्व प्रदीप या आपल्या परिवाराने घरोघरी श्री गुरुचरित्र पोहोचावे या उदात हेतूने वरील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे मागील एक वर्षाच्या कालखंडात 108 व 1008 पारायण यांचे सामुदायिक कार्यक्रम सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने यथोचितरीच्या यापूर्वी संपन्न झालेले आहे व अधिकाधिक ठिकाणी याच पद्धतीने पारायण आयोजित करून गुरुत्व बोधाचा दीप प्रज्वलित करण्याचा गुरुतत्त्व प्रदीप यांचा मानस आहे.

सदरील पारायण सेवा निशुल्क असून पारायणास बसणाऱ्या वाचकास पारायण समाप्तीनंतर आयोजकांतर्फे ग्रंथ प्रसाद रूपाने दिला जाणार आहे. सकाळी 6 ते सा7 नित्य पूजा, सकाळी 8 ते 10 राजोपचार लघु रुद्र अभिषेक, सकाळी 8 ते 9.30 सेवानंद संगीत सभा, सकाळी 10 ते 12 नित्य पाठ व श्री गुरुचरित्र सारामृत पारायण, दुपारी बारा ते साडेबारा भिक्षा, नैवेद्य आरती व त्यानंतर दुपारी 12 ते 3 माध्यन्य भोजन प्रसाद दुपारी 1 ते 2:30 सेवानंद संगीत सभा व दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 श्री गुरुचरित्र कथामृत असा हा साप्ताहिक कार्यक्रम असणार आहे. दिनांक 30 जून ते 7 जुलै हा साप्ताहिक कार्यक्रमाचा कालखंड आहे.

या कार्यक्रमासाठी परभणीच्या श्री क्षेत्र दत्तधाम चे परमपूज्य मकरंद महाराज, सो मानसी मकरंद वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत असून या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ब्राह्मण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, शंतनु पांडे, मिलिंद टाकळकर, शेखर लांडगे मुकुंद मोगरेकर व इतर हजारो दत्त सेवक कार्यक्रम यशस्वीतेसाठी झटत आहेत.
