ASHA and group promoters march on Kinwat Taluka Health Officer’s office नांदेड| सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने ३० जून रोजी किनवट येथील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन निवेदन देण्यात आले. गोंडाराजे मैदान जवळील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथून दुपारी एक वाजता मोर्चा काढण्यात आला.



९ जुलै रोजी देशव्यापी संपाच्या निमित्ताने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाच्या दिवशी सर्व आशा आणि गटप्रवर्तक कामावर येणार नाहीत असे स्पष्ट पत्र तालुका आरोग्य अधिकारी आणि प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच आयुक्त कुटुंब कल्याण व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना सीटू च्या वतीने देण्यात आले आहे.


स्थानिक व राज्य – केंद्र स्तरावरील विविध मागण्या या मोर्चा मध्ये करण्यात आल्या आहेत. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार, जिल्हा महासचिव कॉ.गंगाधर गायकवाड आणि उपाध्यक्षा कॉ. शिलाताई ठाकुर, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड, कॉ. निर्मलाताई शिनगारे यांनी केले.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी अनेक आशा ताईंनी प्रयत्न केले. तसेच ९ जुलै रोजी नांदेड येथे होणाऱ्या मोर्चा मोठ्या संख्येने सामील होण्याचा निर्णय घेण्यात आला. – कॉ. उज्वला पडलवार, जिल्हाध्यक्षा – आशा व गटप्रवर्तक फेडरेशन नांदेड जिल्हा.