Gurucharitra Saramrit : गुरुतत्त्व प्रदीप नांदेड आयोजित,1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायणास प्रचंड प्रतिसाद
huge response to 1008 Shri Gurucharitra Saramrit Parayana नांदेड| गुरुतत्त्व प्रदीप नांदेड आयोजित 1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व श्री गुरुचरित्र कथामृत सप्ताहास आज भक्ती लॉन्स मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून जवळपास 2100 पुरुष महिला यांनी श्री गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. सदरील पारायण व कथामृत सप्ताहास प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. दक्षिणगंगा गोदावरी मातेच्या नाभीस्थानी वसलेल्या व संत मंहंताच्या वास्तव्याने पवन झालेल्या नांदेड नगरीमध्ये 11 पारायणाच्या मालिकेतील आठवे पुष्प आयोजित करण्यात आले आहे.
धकाधकीच्या काळातही श्री गुरुचरित्राची नितांत गरज असल्याकारणाने सर्व कडक नियमांना शिथिलता देऊन सर्व समाजातील स्त्री-पुरुषांना वाचता येण्याकरता या ग्रंथाची निर्मिती करून घेण्यात आली आहे. नांदेडच्या गुरुतत्त्व प्रदीप या आपल्या परिवाराने घरोघरी श्री ग...


