HomeनांदेडBSF jawan martyred | हडकोतील बीएसएफ जवान कामेश कदम यांना हरियाणात वीरमरण...

BSF jawan martyred | हडकोतील बीएसएफ जवान कामेश कदम यांना हरियाणात वीरमरण – NNL

आज रात्री उशिरा पार्थिव देह निवासस्थानी आणण्यात येणार, गुरुवारी होतील अंत्यसंस्कार

नांदेड| हडको येथील रहिवासी असलेले बीएसएफ जवान तथा नाईक पदावर कार्यरत असलेले कामेश विठ्ठलराव कदम (वय ४२) यांना ८ जुलै रोजी हरियाणात कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या या वीरमरणामुळे संपूर्ण सिडको – हडकोत शोककळा पसरली आहे.

हडको येथील रहिवासी कामेश कदम हे सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमध्ये १६ जुलै २००३ रोजी रुजू झाले होते. आपल्या कर्तव्यकाळात नाईक पदावर पोहोचले होते. कामेश कदम यांनी आपल्या सीमा सुरक्षा दलातील आपल्या कर्तव्य कार्यकाळात दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, बांगलादेश बॉर्डर येथे सेवा बजावली होती. सध्या ते हरियाणा येथे कार्यरत होते.

कामेश कदम ९ जुलै रोजी कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंगेश कदम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. शहीद कामेश कदम यांचे पार्थिव देह बुधवारी रात्री उशिरा हडको त्यांच्या निवासस्थानी पोहोचेल अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

त्यांच्या मृत्यू पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. शहीद कामेश कदम यांचे पार्थिव देह बुधवारी रात्री उशिरा हडको येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचेल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. गुरुवारी त्यांच्या पार्थीव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांचे ते बंधू होत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments