Saturday, May 16

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mp nagesh patil ashtikar ; खा.नागेश पाटील उद्या माहुर तालुक्याच्या दौऱ्यावर -NNL

Mp nagesh patil ashtikar ; खा.नागेश पाटील उद्या माहुर तालुक्याच्या दौऱ्यावर -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खा. नागेश पाटील आष्टीकर हे उद्या दि. २३ रोजी तालुक्यातील नागरिक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतीबा खराटे यांनी दिली आहे. खा.नागेश पाटील आष्टीकर हे तालुक्यात जनसंपर्क दौरा करणार असुन ते दि. २३ रोजी सायंकाळी ४ वाजता माहुर येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधुन वानोळा, कुपटी, वाई बाजार, गोडवडसा, सारखणी मांडवी, कनकी येथिल नागरीकाशी संवाद साधणार आहेत, या वेळी त्यांच्या समवेत उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असणार आहेत....
Devendra Fadnavis : लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुण्यात वसतिगृहासाठी शासन देणार जागा-देवेंद्र फडणवीस -NNL

Devendra Fadnavis : लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुण्यात वसतिगृहासाठी शासन देणार जागा-देवेंद्र फडणवीस -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई आणि पुण्यात वसतिगृहासाठी शासन जागा देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेच्या मंचावरून केली. खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही यात्रा मुंबईत दाखल झाली असून खा.गोपछडे यांनी केलेल्या सर्व मागण्यांची देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. सन्मान यात्रेचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. समस्त लिंगायत समाजाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य हृद्य सत्कार करण्यात आला. वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा खा. डॉ. अजितजी गोपछडे यांच्या नेतृत्वात दि. 5 सप्टेंबर रोजी भक्तीस्थळ, श्रीक्षेत्र राजुर (अहमदपूर) येथून आरंभ झाली. महाराष्ट्रातील अनेक शहरात या यात्रेचे भव्य स्वागत होत आहे. मुंबईत ही यात्रा दाखल झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजाच्यावती...
Ram Patil Ratolikar : जनतेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा आपला निर्धार- राम पाटील रातोळीकर -NNL

Ram Patil Ratolikar : जनतेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा आपला निर्धार- राम पाटील रातोळीकर -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जनतेतून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडून आलो, तर कार्यकर्त्यांना योग्य ती संधी देता येईल, शासन स्तरावर जनतेची कामेही सन्मानपूर्वक करता येतील, त्यामुळे पुन्हा विधान परिषदेवर न जाता आपण निवडणुकीला सामोरे जावे, असा असा मनाशी पक्का निर्धार करून आपण लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहोत, त्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचे सहकार्य आपल्या पाठीशी राहील, असा आत्मविश्वास माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रातोळी येथे आयोजित देगलूर-बिलोली व नायगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद व स्नेहभोजन मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले,आपण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना शासनस्तरावर जी कामे सन्मानपूर्वक झाली, त्या तुलनेत विधान परिषद सदस्य असताना 25 टक्केही झाली नाहीत. जनतेतून निवडून आल्य...
Govinda : खा. नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गोविंदाला घातले साकडे -NNL

Govinda : खा. नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गोविंदाला घातले साकडे -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| आप्पारावपेठ पंचक्रोशी भागातील भावीक भक्तांचे श्रद्धास्थान आणि सर्व धर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी भावभक्तीने प्रमुख उपस्थिती दर्शवीत गोविंदाचे दर्शन घेतले. किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील मौजे अप्पारावपेठ येथे दीडशे वर्षाची परंपरा कायम ठेवत गोविंदा सप्ताह कार्यक्रम भावभक्तीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व धर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशी भागातून भाविभक्तांची व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते असे सर्व धर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवित गोविंदाचे दर्शन घेतले यावेळी गावकऱ्यांच्या वतीने विनायक देशमुख यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आ...
Kashinath Mali ; राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा स्वबळावर लढणार – काशीनाथ माळी – NNL

Kashinath Mali ; राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा स्वबळावर लढणार – काशीनाथ माळी – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l होळकरनगर सिडको नांदेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,या बैठकिला मार्गदर्शन करताना अध्यक्षिय भाषणात प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी शेवते म्हणाले आपला पक्ष २८८ जागेवर स्वबळावर लढवण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टिने आपापल्या मतदारसंघात तालुका प्रमुखांनी कार्यकर्त्यां सोबत घेवून बुथ बांधणीच्या कामाला लागावे आणि गाव तिथे शाखा काढावेत. आपल्या मतदारसंघात इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी पक्षाकडे आपल्या मार्फत अर्ज करावेत, त्यातून पक्षाने जो उमेदवार देतील त्यांना निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर म्हणाले, जो पर्यंत स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणूकिच्या रिंगणात पक्ष उतरणार नाही तो पर्यंत पक्ष मोठा होणार नाही आणि पक्ष सत्तेत येणार नाही. सत्तेत आल्याशिवाय राष्ट्रीय समाजास...
former MP Bhaskar Rao Patil Khatgaonkar’s entry into Congress : काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश -NNL

former MP Bhaskar Rao Patil Khatgaonkar’s entry into Congress : काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
मुंबई| भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. नांदेडचे माजी खासदार, भाजपा नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी दादर स्थित प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. “भास्करराव पाटील खतगावकर हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टिळक भवनमध्ये पक्ष प्रवेश झाला असला तरी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घ...
National Samaj Party ; राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठक – NNL

National Samaj Party ; राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठक – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l २० सप्टेंबर २०२४ रोज शुक्रवारी हिगोलीहुन दुपारी २वाजता प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी नांदेड नगरीत येणार असुन, शहरात महात्मा पुतळ्यास पुष्पहार घालून कौठा मार्गे होळकर नगर सिडको येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या आढावा बैठकिला ३ वाजता उपस्थित राहाणार आहेत . बैठकी नंतर संध्याकाळी ६. वाजता लोहा मार्गे लातूर कडे निघणार आहेत. बैठकीत येत्या सन २०२४ मधिल विधानसभा निवडणुकाच्या संबंधाने प्रत्येक मतदारसंघचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर,प्रदेश सचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर, मराठवाडा अध्यक्ष विष्णु गोरे, यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहावे. येते वेळी आपापल्या मतदारसंघातील आढावा अहवाल सोबत घेवून यावे . असे आवाहन जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे,जिल्हा महिलाध्यक्षा अरूणा साखरे,जिल्हा उपाध्यक्ष ...
Cleaning and drainage should be done under CIDCO ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत साफसफाई व नालेसफाई करावी,माजी नगरसेविका ललिता शिंदे – NNL

Cleaning and drainage should be done under CIDCO ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत साफसफाई व नालेसफाई करावी,माजी नगरसेविका ललिता शिंदे – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको हडको परिसरात सार्वजनिक ठिकाणी व परिसरातील अनेक भागात साफसफाई होत नसल्याने व नाले सफाई न झाल्याने तुंबलेल्या नाल्या मुळे व दुरंगधी पसरल्याने परिसरातील नागरीकाचे आरोग्य धोक्यात आले असुन तात्काळ साफ सफाई करावी अशी मागणी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या कडे निवेदनाद्वारे माजी नगरसेविका ललिता शिंदे यांनी केली आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालय समोरील व आजूबाजूच्या भागात व परिसरात अनेक ठिकाणी,सार्वजानिक भागात मोठ्या प्रमाणात केरकचरा व नाल्या तुंबलेले असल्यामुळे दुरंगधी पसरली आहे,वारंवार संबंधित स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देऊन ही कचरा उचलत नसल्याने नागरीकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. अखेर या प्रकरणी सहाय्यक आयुक्त यांच्या कडे निवेदनाद्वारे साफ सफाई व नाल्यातील कचरा काढण्याची मागणी माजी नगरसेविका ललिता बोकारे (शिंदे),विजयाताई गोडघासे,मधुबाला पुरी आण...
Survey of Nanded-Latur railway line : नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर – खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश -NNL

Survey of Nanded-Latur railway line : नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर – खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे मंजूर करण्यात आला असून, सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात ही बाब नमूद आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुमारे १०४ किलोमीटर लांबीच्या नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गासाठी पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम 'महारेल'च्या माध्यमातून प्राथमिक अहवाल तयार करून घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचारार्थ पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार सध्या फायनल लोकेशन सर्व्हे सुरु असून, त्याचा अहवाल तयार झाल्यानंतर या प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी आपल्या पत्रात म...
Ashokrao Chavan : नांदेड जिल्ह्यात बीएसएनएल ९ टॉवर उभारणार; खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश -NNL

Ashokrao Chavan : नांदेड जिल्ह्यात बीएसएनएल ९ टॉवर उभारणार; खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जिल्ह्याच्या भोकर व मुदखेड तालुक्यातील नऊ गावांमधील दूरसंचार सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने टॉवर उभारण्यास मंजुरी दिली असून, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना या टॉवरच्या उभारणीसाठी जमीन भाडे तत्त्वावर घेण्यास किंवा संपादन करण्यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. या गावांमध्ये भोकर तालुक्यातील पाकी, पाकी तांडा, जामदरी, इळेगाव, सावरगाव माळ, भुरभुशी, देवठाणा तर मुदखेड तालुक्यातील दरेगाव आणि पिंपळकौठा मगरे या गावांचा समावेश आहे. संबंधित गावकऱ्यांनी आपल्या गावात दर्जेदार दूरसंचार सेवा मिळत नसल्याची तक्रार खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी या संदर्भात दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह बीएसएनएलच्या नवी द...
error: Content is protected !!