किनवट, परमेश्वर पेशवे| आप्पारावपेठ पंचक्रोशी भागातील भावीक भक्तांचे श्रद्धास्थान आणि सर्व धर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी भावभक्तीने प्रमुख उपस्थिती दर्शवीत गोविंदाचे दर्शन घेतले.
किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील मौजे अप्पारावपेठ येथे दीडशे वर्षाची परंपरा कायम ठेवत गोविंदा सप्ताह कार्यक्रम भावभक्तीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व धर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशी भागातून भाविभक्तांची व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते असे सर्व धर्मीयांचे प्रतीक असलेल्या गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवित गोविंदाचे दर्शन घेतले यावेळी गावकऱ्यांच्या वतीने विनायक देशमुख यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक हे संयुक्तरित्या पहिल्यांदाच गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी आप्पारपेठ येथे आले असता गोविंदाचे दर्शन घेऊन त्यांनी गोविंदाला साकडे घालत शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळू दे आणि या भागातील शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभु दे असे साकडे घातल्याची भावना खासदार नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी भाविभक्तांची व महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते यासाठी इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे,हे देखील प्रामुख्याने आपल्या पोलीस दलासह येथे उपस्थित होते तसेच या भागात ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावले असे तात्कालीन पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, लुंगारे हे देखील गोविंदाचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. गोविंदाचे दर्शन सर्व भावी भक्तांना व्हावे यासाठी गोविंदाच्या पालखीची गावामध्ये भव्य मिरवणूक काढून गोविंदाची मूर्ती पद स्थानी पुन्हा ठेवले जाते अशा या गोविंदाच्या कार्यक्रमाला भावी भक्तासह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता .
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचेक किनवटचे तालुकाप्रमुख मारोती दिवशे पाटील हिमायतनगर चे तालुकाप्रमुख विठ्ठल ठाकरे भुजंगराव पाटील, उदय पाटील पाटील, सत्यनारायण पाटील, राम राठोड, सूर्यकांत सूर्यवंशी खडकीकर, व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे दत्तराव मोहिते माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू सिंग नाईक बालाजी बामणे, शिवराम जाधव शेख जब्बार,दयाळ धानोरा येथील प्रकाश जाधव, उत्तम राठोड, मनोज राठोड डॉ भगवान गंगासागर, शिवाजी बोटेवाड, बंडू उरे, कोल्हारीचे दिलीप जमादार, गंगाधर जाधव, बाळासाहेब शेरे अनवर शेख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह गावातील प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरंडकर, विनायक देशमुख, सरपंच शेख अब्दुल रब, उपसरपंच यरन्ना कौड, माजी सरपंच श्रीधर रेड्डी लोका, किनी भूमेश, भोज्या रेडी नुतूल, चंद्रकांत आरंडकर, सतीश सोनारे, कडताल गगंन्ना, नागेश तोटावाड, साईनाथ एम्पेल्ली, बी राजेंना, गोरा असेन्ना, शेख रमजान, मारुती देशमुख, मोरे महादू, धोबी गंगाधर, ए लिंगय्या हनमलू तसेच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले व बिट जमादार पठाण आणि पत्रकारासह गावातील प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माजी सरपंच नुतूल भोज्जा रेड्डी यांनी गावकऱ्यातर्फे गोविंदाच्या सभा मंडपासाठी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे यावेळी केली असता नागेश पाटील आष्टीकर यांनी गोविंदाच्या सभा मंडपासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.