Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Tribute to Ajitdada : लोहयात अजितदादांना श्रध्दांजली ; सर्व प्रतिष्ठाने शाळा महाविद्यालय बंद

Tribute to Ajitdada : लोहयात अजितदादांना श्रध्दांजली ; सर्व प्रतिष्ठाने शाळा महाविद्यालय बंद

नांदेड, राजकीय
लोहा| राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अख्खा लोहा शहर व मतदारसंघ शोककळा पसरली असून आमदार प्रतापराव पाटील व कार्यकर्ते डसाडसा रडताहेत.अनाकलनिय वेदनादायी घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. लोहा शहरातील शाळा, महाविद्यालय, सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून शहरवासियांनी दुखवटा।पाळला. नगर पालिका प्रांगणात बुधवारी सकाळी युवा नेते पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व श्रद्धांजली वाहण्यात आली. लोहा-कंधार मतदार संघात उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे चाहते प्रचंड होते. निधनाची बातमी कळताच आ, प्रतापरावाना अश्रू अनावर झाले . सगळ्या कार्यकत्यांना घटनेचे प्रचंड दुःख झाले. फारच वाईट झाले असा अंतरकरणातून संवेदना व्यक्त करत कार्यकर्ते अश्रू ढळत होते. शहरात शाळा महाविद्यालय, सर्व दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आले व दुखवटा पाळण्यात आला. ...
post of Housing Society : गंगाधर कल्याणकर यांच्या ठोस भूमिकेमुळे हाउसिंग सोसायटी अध्यक्ष पदाची निवड रद्द

post of Housing Society : गंगाधर कल्याणकर यांच्या ठोस भूमिकेमुळे हाउसिंग सोसायटी अध्यक्ष पदाची निवड रद्द

नांदेड, राजकीय
बिलोली, गोविंद मुंडकर| सेवा सहकारी सोसायटी बिलोली येथील चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले. ही प्रक्रिया नियमबाह्य व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या सर्व आक्षेपांनंतरही मागील तारखेतील ठराव दाखवत अध्यक्षपदी प्रसिद्ध व्यापारी विठ्ठलराव रायकंठवार यांची निवड करण्यात आली आहे. सेवा सहकारी सोसायटी यातील गैर प्रकाराचे पडसाद हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर पडले. संचालक गंगाधर कल्याणकर यांच्या ठोस मांडणीमुळे हाउसिंग सोसायटीची अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया थांबवण्यात आली. मंगळवार, दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी बारा वाजता झालेल्या बैठकीत विद्यमान उपाध्यक्ष यादराव तुडमे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. तांत्रिक कारणांमुळे उपाध्यक्ष पदाची निवड मात्र स्थगित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सचिवांकडून पाठवण्यात आलेले पत...
Dr. Sanjay Pawar : पत्रकार बांधवांच्या मार्गदर्शनानुसार आगामी राजकीय भूमिका ठरवणार- डॉ. संजय पवार

Dr. Sanjay Pawar : पत्रकार बांधवांच्या मार्गदर्शनानुसार आगामी राजकीय भूमिका ठरवणार- डॉ. संजय पवार

नांदेड, राजकीय
कंधार (सचिन मोरे) विधानसभा निवडणूक २०२६ ची लढवण्यासाठी मी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लोहा- कंधार विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. पण काही कारणास्तव यश आले नाही. त्यातच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी कडून माझी उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. पण इतरांचा हक्क हिरावणे हे माझ्या तत्त्वात नव्हते. आम्ही जात-पात मानत नाही. जातीयवादी,धर्मवादी पक्षाचे आमचे विचार जुळत नाहीत. त्यामुळे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून हजारो गोरगरीब, कष्टकरी दिन- दुबळ्यांची सेवा करत त्यांचे अश्रू पुसण्याचे काम आम्ही करणार असून पत्रकार हे माझ्या कुटुंबाचे घटक असून त्यांचे मार्गदर्शन घेऊन लवकरच आगामी राजकीय भूमिका ठरवणार असल्याची भावनिक उद्गार ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य संजय पवार यांनी काढले. प्राचार्य संजय...
Mla. Baburao Kadam Kohlikar : “मी जे जनतेला आश्वासन देतो ते प्रत्यक्षात उतरवतो, केवळ ‘शो’ करत नाही” – आ. बाबुराव कदम कोहळीकर

Mla. Baburao Kadam Kohlikar : “मी जे जनतेला आश्वासन देतो ते प्रत्यक्षात उतरवतो, केवळ ‘शो’ करत नाही” – आ. बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड, राजकीय
हदगाव,शेख चांदपाशा | जनतेला दिलेल्या आश्वासनांमध्ये कोणतीही तडजोड न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणारा नेता म्हणून ओळख असलेले हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी “मी जे सांगतो ते करून दाखवतो, केवळ घोषणा करून शो करत नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाच्या औचित्याने हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील पत्रकारांचा गौरव सन्मान सोहळा नांदेड रोडवरील वेंकटरमना हायटेक इंग्लिश स्कूल येथे पार पडला. यावेळी आमदार कोहळीकर बोलत होते. आ. कोहळीकर यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत सर्वधर्मीय भव्य विवाह सोहळा तसेच पुणे–नागपूरच्या धर्तीवर भव्य कृषी प्रदर्शन हदगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे. या उपक्रमांमधून सर्वसामान्य शेतकरी, युवक व समाजातील प्रत्येक घटकाला लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त ...
Republican day : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republican day : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नांदेड, राजकीय
नांदेड | भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र पर्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाच्या वतीने नांदेड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शहरातील डॉक्टरलाईन येथील पक्षाच्या शहर जिल्हा कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगांवकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपाच्या माजी उपमहापौर डॉ. शीलाताई सुनील कदम, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ. सिंधुताई देशमुख, डॉ. दत्तात्रय कदम, माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर, लक्ष्मण भवरे, युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष स. मनबीरसिंघ ग्रंथी, विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक...
Republic Day celebrated : हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republic Day celebrated : हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी हिमायतनगर जिल्हा नगरपंचायत कार्यालयात ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना नगराध्यक्ष शेख रफिक यांनी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रभारी मुख्याधिकारी ताडेवाड, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी, जिल्हा परिषद कन्या शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेझिम सादरीकरणाने वेधले लक्ष ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्हा परिषद कन्या शाळेच्या  व...
Betmogrekar–Karhale–Belge : प्रजासत्ताक दिनाच्या कर्तव्य पथावरील शानदार परेडसाठी बेटमोगरेकर–कऱ्हाळे–बेळगे दिल्लीत

Betmogrekar–Karhale–Belge : प्रजासत्ताक दिनाच्या कर्तव्य पथावरील शानदार परेडसाठी बेटमोगरेकर–कऱ्हाळे–बेळगे दिल्लीत

नांदेड, देश विदेश, राजकीय
नांदेड| निवडणुकीतील पराभवाचे शल्य काही काळ बाजूला ठेवत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे व माजी जि.प. सभापती संजय बेळगे हे ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य व नेत्रदीपक परेडचे साक्षीदार ठरत आहेत. अलीकडेच झालेल्या नगरपालिकेच्या तसेच नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये या तिन्ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्या राजकीय अपयशाने खचून न जाता, ऐतिहासिक राष्ट्रीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा आनंद हे तिघेही घेत आहेत. २६ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या राष्ट्रध्वजारोहणानंतर कर्तव्य पथावर सादर होणारी भव्य परेड जगभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. हा अविस्मरणीय सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य या तिन्ही मित्रांना लाभले असून, त्यासाठी जिल्ह्याचे खासदार र...
former MLA Madhavrao Patil ; हदगाव–हिमायतनगरचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर : विकासाला राजकीय धार देणारे नेतृत्व

former MLA Madhavrao Patil ; हदगाव–हिमायतनगरचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर : विकासाला राजकीय धार देणारे नेतृत्व

नांदेड, राजकीय
हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात माधवराव पाटील जवळगावकर हे नाव ठामपणे कोरले गेले आहे. सत्ता ही वैयक्तिक उंची वाढवण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असते, या तत्त्वावर त्यांनी आपले राजकारण उभे केले. त्यामुळेच ते केवळ माजी आमदार न राहता तळागाळातील जनतेचा विश्वासार्ह प्रतिनिधी ठरले. या मतदारसंघाला दीर्घकाळ विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले गेले होते. मात्र जवळगावकर यांनी ही स्थिती बदलण्याचा निर्धार केला. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी रस्ते, सिंचन, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण व आरोग्य या मूलभूत विषयांना अग्रक्रम देत शासनावर सातत्याने दबाव टाकला. रखडलेली कामे मार्गी लावणे, निधी मिळवणे आणि तो प्रत्यक्ष कामात उतरवणे, ही त्यांची राजकीय कार्यशैली होती. शेतकरी हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. दुष्काळ, अतिवृष्टी, पीकनुकसान, हमीभाव, कर्जमाफी यां...
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 25 जानेवारी रोजी नांदेड दौरा

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 25 जानेवारी रोजी नांदेड दौरा

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान विविध धार्मिक व शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून दुपारी 12.35 वाजता विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 1.35 वाजता त्यांचे श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन होईल. यानंतर दुपारी 2 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगमनाप्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2.05 वाजता मोटारीने ते तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिबजी, नांदेड येथे रवाना होतील. दुपारी 2.15 वाजता गुरुद्वारात आगमन होईल. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री मोटारीने मोदी मैदान, वाघाळा, नांदेड येथे प्रयाण करतील. दुपारी 3.10 वाजता तेथे आगमन होईल. येथे आयोजित “हिंद-द...
Cm bhagwant mann : नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : मुख्यमंत्री भगवंत मान

Cm bhagwant mann : नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : मुख्यमंत्री भगवंत मान

नांदेड, देश विदेश, राजकीय
नांदेड| सचखंड श्री हजूर साहिब ही श्रद्धा, त्याग आणि बलिदानाची पवित्र भूमी असून या भूमीवर होत असलेला शहीदी समागम हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले. ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोदी मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री मान म्हणाले की, सेवा हाच खरा धर्म असून या शहीदी समागमाच्या माध्यमातून समता, बंधुता आणि करुणेचा संदेश संपूर्ण देशभर पोहोचत आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार, कार्य व त्याग पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असून त्यांचा जीवनप्रवास नव्या पिढीसमोर असणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी त्यांनी नांदेड येथी...
error: Content is protected !!