Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

नांदेड, राजकीय
लोहा| “सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारे महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आपण गमावले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही,” अशा भावनिक शब्दांत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. लोहा नगर परिषदेच्या प्रांगणात बुधवारी (ता. ४ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजितदादांच्या आठवणी सांगताना आ. चिखलीकर यांचे डोळे पाणावले होते. “दादांचे विचार, कार्यपद्धती आणि शेवटच्या घटकेपर्यंत गरजवंतांसाठी मदतीची भावना आत्मसात करून काम करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी सांगितले. या शोकसभेस आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद ...
Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’

Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| गेल्या दहा वर्षांत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी हदगाव नगरपरिषदेला प्राप्त होऊनही शहराच्या आर्थिक स्थितीची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नगरपरिषदेची वार्षिक कर वसुली अवघी ३६ लाख रुपये इतकी असून, पाणीपुरवठ्यासाठी महावितरणची तब्बल ७५ लाख रुपयांची वीज थकबाकी प्रलंबित आहे. याशिवाय उपविभागीय कार्यालयाकडे ३० लाख रुपये इमारत भाडे थकीत असल्याचेही उघड झाले आहे. विशेष म्हणजे १९९२ पासून शहरात नवीन करप्रणालीच लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे महसूल वाढीचे कोणतेही ठोस नियोजन न करता नगरपरिषद चालवली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाकडून आलेला विकास निधी नेमका कुठे खर्च झाला, शहराचा प्रत्यक्ष विकास कुठे दिसतो, की फक्त कागदोपत्रीच कामे दाखवली गेली—असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नगरपरिषदेच्या या ढासळलेल्या आर्...
Baburao Kadam Kohlikar ; हदगाव–हिमायतनगर पत्रकार भवनासाठी ४० लाखांचा निधी देणार – आ. बाबुराव कदम कोहळीकर

Baburao Kadam Kohlikar ; हदगाव–हिमायतनगर पत्रकार भवनासाठी ४० लाखांचा निधी देणार – आ. बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड, राजकीय
हदगांव/हिमायतनगर l हदगाव– हिमायतनगर तालुक्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारणीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही तालुक्यांमध्ये जागा निश्चित केल्यानंतर पत्रकार भवनाच्या इमारत बांधकामासाठी हदगाव व हिमायतनगर तालुक्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये, असा एकूण ४० लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात आमदार कोहळीकर यांच्या वतीने हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील पत्रकारांचा शाल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः आमदार बाबुराव कदम कोहळीकर होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती बालासाहेब कदम, शिवसेना गटनेते गोपाल सारडा, युवा जिल्हाप्रमुख संदेश पाटील, शिवसेना माजी उपजिल्ह...
Ajitdada Pawar : देगलूर नगरपालिकेत स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याची मागणी

Ajitdada Pawar : देगलूर नगरपालिकेत स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याची मागणी

नांदेड, राजकीय
देगलूर (जि. नांदेड) | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा अनंतराव पवार यांच्या स्मरणार्थ देगलूर नगरपालिका हद्दीत योग्य जागा उपलब्ध करून भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य – मराठवाडा विभागाचे अध्यक्ष धनाजी जोशी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. धनाजी जोशी यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत वैयक्तिक पुढाकारातून ही मागणी प्रशासनापुढे मांडली असून, निवेदनात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीला दिलेले बळ, कृषी विकास, ग्रामीण भागाचा कायापालट, पायाभूत सुविधा, तसेच प्रशासनातील धाडसी व लोकाभिमुख निर्णयांमुळे स्व. अजितदादा ...
MLA Jitesh Antapurkar : संस्कृती जपतानाच विकासालाही मतदारसंघातील जनतेचे प्राधान्य – आमदार जितेश अंतापुरकर

MLA Jitesh Antapurkar : संस्कृती जपतानाच विकासालाही मतदारसंघातील जनतेचे प्राधान्य – आमदार जितेश अंतापुरकर

नांदेड, राजकीय
बिलोली | बिलोली–देगलूर विधानसभा मतदारसंघातील जनता आपली सांस्कृतिक ओळख जपतानाच विकासालाही तितकेच महत्त्व देते, असे प्रतिपादन आमदार जितेश अंतापुरकर यांनी केले. चैनपूर येथे सुमारे ९० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास शिक्षण सभापती मिसाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत खानापूरकर, सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर, निवृत्त अभियंता साहेबराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अंतापुरकर पुढे म्हणाले की, “ज्या गावात माझे वडील शिक्षणासाठी राहिले, त्या गावाने त्यांना दिलेले प्रेम, स्नेह आणि आपुलकी मी कधीही विसरू शकत नाही. अंतापुर आणि चैनपूर ही दोन वेगवेगळी गावे असली, तरी मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी माझी भूमिका नेहमीच सकारात्मक आणि विकासाभिमुख राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...
Ajitdaad’s last words : ‘एआय’मधून उमटले अजितदादांचे शेवटचे शब्द; महाराष्ट्राचे मन हेलावले

Ajitdaad’s last words : ‘एआय’मधून उमटले अजितदादांचे शेवटचे शब्द; महाराष्ट्राचे मन हेलावले

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajitdaad's last words) यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. “काम, शिस्त आणि जबाबदारी” यांचा आदर्श घालून देणारे नेतृत्व अचानक निघून गेल्याची जाणीव अजूनही स्वीकारता येत नाही. अशाच वेळी ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारलेला एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, तो पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत नकळत पाणी आणतो आहे. या व्हिडीओमध्ये अजितदादांच्या मनातील कुटुंबाप्रतीची आस्था, भावकीबद्दलची माया आणि जनतेसाठीची तळमळ जिवंतपणे उमटते. पत्नी सुनेत्रा, बहीण सुप्रिया आणि पुढील पिढीकडे निर्देश करताना “संस्कार आणि कामाचा ध्यास” हेच वारस म्हणून जपण्याचा संदेश त्यांनी दिला आहे, अशी भावनिक अनुभूती हा व्हिडीओ देतो. दादांच्या शब्दांतून पत्नीच्या खंबीर पाठबळाचा उल्लेख, मुलांबाबतची आपुलकी, तर साहेबांप्रती असलेली क...
Sunetra Pawarani takes oath as Deputy Chief Minister : दुःखातून धैर्याचा उगम; सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्यकारणात रचला नवा इतिहास

Sunetra Pawarani takes oath as Deputy Chief Minister : दुःखातून धैर्याचा उगम; सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्यकारणात रचला नवा इतिहास

नांदेड, पुणे, मुंबई, राजकीय
मुंबई, विशेष प्रतिनिधी| कौटुंबिक शोक आणि राजकीय अनिश्चिततेच्या कठीण काळातून जात असतानाही, पक्ष व राज्याच्या जबाबदारीसाठी पुढे येत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar takes oath as Deputy Chief Minister) यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी ठीक पाच वाजता राजभवनात पार पडलेल्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव कोरले गेले. शपथ घेताना त्यांनी दिवंगत अजित पवार यांना स्मरून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी भावूक करणारा ठरला. राजभवनचा सेंट्रल हॉल “एकच वादा… अजितदादा!”“अजितदादा अमर रहे!” अशा घोषणांनी भारावून गेला. या सोहळ्यासाठी विविध पक्षांचे नेते, आमदार, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख...
Mumbai Politics news : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार..!

Mumbai Politics news : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार..!

नांदेड, राजकीय
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक घडामोड घडली असून, सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तातडीची बैठक या महत्त्वपूर्ण निर्णयापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते, तर सुनेत्रा पवार या ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. बैठकीत शपथविधीच्या...
Ajitdada pawar : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामूळे अभ्यासू व दुरदृष्टीचे नेतृत्व हरपले- डॉ.सुनील कदम

Ajitdada pawar : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामूळे अभ्यासू व दुरदृष्टीचे नेतृत्व हरपले- डॉ.सुनील कदम

नांदेड, राजकीय
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामूळे अभ्यासू व दूरदृष्टीचे नेतृत्व हरपल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या डाॅक्टरलाईन येथिल पक्षाच्या शहर जिल्हा कार्यालयात आज आदरांजली वाहण्यात आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना साश्रूनयनांनी अभिवादन करुन आदरांजली वाहिली. यावेळी पूढे बोलतांना डॉ.सुनील कदम म्हणाले की, शिव-फुले-शाहू-आंबेडकर आदी महामानवांच्या पुरोगामी विचारांचा वारसा रुज...
Ajitdada Pawar : अजितदादा पवार यांना हिमायतनगरात सर्वपक्षीय श्रद्धांजली; बाजारपेठ बंद ठेवून शोक व्यक्त

Ajitdada Pawar : अजितदादा पवार यांना हिमायतनगरात सर्वपक्षीय श्रद्धांजली; बाजारपेठ बंद ठेवून शोक व्यक्त

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जनतेचे लाडके नेते अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत झालेल्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने राज्याने एक कणखर, दूरदृष्टी असलेले आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारे नेतृत्व गमावले आहे. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात सर्वपक्षीय नागरिक व व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील वातावरण शोकमय झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि हळहळ स्पष्टपणे दिसून येत होती. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस यांसह सर्वपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक म...
error: Content is protected !!