Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

नांदेड, राजकीय
नांदेड l राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यात किनवट येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय तर नांदेड, तामसा, मुक्रमाबाद व इस्लापूर या चार ठिकाणी अपर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरात ११ अपर जिल्हाधिकारी कार्यालय तर ६९ अपर तहसील कार्यालयांची निर्मिती करण्याच्या निर्णयावर मोहर लावण्यात आली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय तर नांदेड (ता. नांदेड), तामसा (ता. हदगाव), मुक्रमाबाद (ता. मुखेड) व इस्लापूर (ता. किनवट) येथे अपर तहसील कार्यालयाचाही समावेश आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला बळकटी मिळणार असून, नागरिकांची कामे सुलभ होणार आहेत. या निर्णयाबद्दल खा. अशोकराव ...
Mp Ashok Chavhan : महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करा! खा. अशोकराव चव्हाण यांची शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत मोठी मागणी

Mp Ashok Chavhan : महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करा! खा. अशोकराव चव्हाण यांची शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत मोठी मागणी

नांदेड, राजकीय
नांदेड l शेतकऱ्यांच्या हितासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही भावांतर योजना लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज राज्यसभेत केली. केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केली होती. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे बाजारात शेतीमालाचे दर कोसळल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान समर्थन मूल्य आणि बाजारभाव यांतील फरकाची रक्कम थेट दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे शक्य होते. ही योजना देशभर तसेच महाराष्ट्रात राबविण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रासाठी, विशेषतः रेल्वे विकासासाठी, अभूतपूर्व ठरणारा असल्य...
gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

नांदेड, राजकीय
नांदेड | नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या कार्यकाळाची मुदत संपत असल्याने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे ९०३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात येते. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणेकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. पंचायत समिती, कृषी, शिक्षण, आरोग्य तसेच अन्य विभागांतील विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. विशेषतः हदगाव तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर प्...
Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| सिरंजनी गावाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांच्या यशस्वी कार्यकाळाच्या पूर्तीनिमित्त संत रोहिदास चौकात कृतज्ञता व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सरपंचांच्या कार्याची दखल घेतली. कार्यकाळात राबविण्यात आलेले पाणीपुरवठा सुधारणा, स्वच्छता अभियान, अंतर्गत रस्त्यांची कामे, सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण व पारदर्शक कारभार यामुळे सरपंच मेघाताई करेवाड यांनी सर्वसामान्य ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय व थेट संवादाची कार्यपद्धती विशेष कौतुकास्पद ठरली असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सरपंच सौ. मेघात...
Mla Bhimrao Keram : आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

Mla Bhimrao Keram : आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

नांदेड, राजकीय
नांदेड l केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियान २.०चा तालुकास्तरीय शुभारंभ आज आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते पंचायत समिती, किनवट येथे उत्साहात पार पडला. किनवट तालुका हा आकांक्षित तालुका कार्यक्रमात समाविष्ट असून, मागील वर्षी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानाच्या पुढील टप्प्याच्या रूपाने हे अभियान राबविले जात आहे. २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात आरोग्य-पोषण, शिक्षण तसेच कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रांतील एकूण ६ महत्त्वाचे निर्देशक १०० टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावेळी आमदार भिमरावजी केराम यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहन केले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभाग व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा...
विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड l जगाच्या कल्याणासाठी होणारा हा महायज्ञ आहे. या यज्ञातुन अनेक चांगल्या गोष्टी जगाच्या कल्याण्यासाठी होत आहेत.यातुन विश्वावर येणारे संकट दुर होईल . यासाठी केदारश्वर रावल जगतगुरु हे यज्ञ करत आहे. तो महायज्ञ आपल्या नांदेड जिल्हयात होत आहे. या महायज्ञामुळे नांदेडकरांचे भाग्य उजाळले आहे. या महायज्ञाचा लाभ येथील जनतेने घ्यावा असे आवाहन करुत जगतगुरु हे नेहमी नांदेडकराच्या उद्धारसाठी प्रयत्न करत आलेत.त्याच्यामुळे मला या सोहळ्याचा भाग होता आले असे मत खा .अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. गोपाळचावडी येथील श्री दशमुखाश्रम भिमाशंकर नगर येथे विश्वशांती महायज्ञ तथा पट्टाभिषेक रजत महोत्सवाचे आयोजक श्री हिमवत केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ रावल श्री श्री श्री १००८ जगतगुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी दि ५ ते १२ दरम्यान आयोजन केले आहे . या ंमहोत्सवाच्या पाचव्या दिवशी शिवकथ...
Hadgaon city : हदगाव शहरात नागरी प्रश्न जैसे थे… सत्ता बदलली; मात्र रस्ते व नागरी समस्या कायमच!

Hadgaon city : हदगाव शहरात नागरी प्रश्न जैसे थे… सत्ता बदलली; मात्र रस्ते व नागरी समस्या कायमच!

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा | हदगाव नगर परिषदेच्या निवडणुका पार पडून नवे नगरसेवक निवडून आले, सत्ता स्थापन झाली; मात्र पदवाटपाचे राजकारण, विषय समितीच्या बैठका रद्द होणे या सगळ्यात शहरातील मूलभूत नागरी प्रश्न मात्र आजही जैसे थे असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. निवडणूक काळात विविध राजकीय पक्षांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, क्रीडांगण, उद्याने, सभागृह यांसारख्या सुविधांची मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना अद्यापही त्याच जुन्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शहरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जीवघेणे खड्डे; अपघातांना निमंत्रण - शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आझाद चौक, राठी चौक, जामा मस्जिद रोडसह अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघातांची शक्यता वाढली असून चौकांमध्ये हायमास्ट दिव्यांची त...
MLA Prataprao Patil Chikhlikar : आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ‘एक्शन मोड’वर

MLA Prataprao Patil Chikhlikar : आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ‘एक्शन मोड’वर

नांदेड, राजकीय
नगराध्यक्ष शरद पवार व टीम कठोर निर्णयाच्या भूमिकेत शहरातील वाहतुकीला शिस्त लावा पार्किंग व्यवस्था मार्गी लावा नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करा लोहा | लोहा शहरात बॅनर लावण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याची गंभीर दखल घेत नगरपालिकेला थेट एक्शन मोडवर आणले आहे. शहरातील कोणत्याही दुकानासमोर किंवा प्रतिष्ठानासमोर बॅनर लावू नयेत, बॅनरसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सक्त सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मागील काही वर्षांपूर्वी शहरात बॅनर व होल्डिंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचा निर्णय कागदावर झाला होता. मात्र नगरपालिकेकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने शहराचे विद्रुपीकरण सुरूच राहिले. अनेक तक्रारी होऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिक व व्...
Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड–वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाली असून, शहराच्या राजकारणात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. शुक्रवार, दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत महापौर पदासाठी ५ तर उपमहापौर पदासाठीही ५ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपा–शिवसेना आघाडी, काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या तिन्ही प्रमुख गटांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले असून, निवडणूक लढत बहुरंगी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर पदासाठी तिहेरी लढत - महापौर पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनांमध्ये भाजपा–शिवसेना आघाडी : २ अर्ज, काँग्रेस–वंचित आघाडी : १ अर्ज, एमआयएम : २ अर्ज, भाजपा–शिवसेना गटातून प्रभाग क्र. ०२ मधील कविता संतोष मुळे यांनी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस–वंचित आघाडीच्या...
Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील महावितरणच्या मनमानी, बेजबाबदार व धोकादायक कारभाराविरोधात ३ फेब्रुवारीपासून सुरू असलेले अर्धनग्न आंदोलन आता ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणात रूपांतरित करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एकूणच खडकाच्या थंडीतही आंदोलनची चर्चा शहरात गरम होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष वामनराव गंगाबाई लक्ष्मणराव मिराशे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, महावितरणच्या विविध गंभीर गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे असून,शहर व ग्रामीण भागात विनापरवानगी बसवलेले डीपी तात्काळ काढून उपविभाग कार्यालयात जमा करावेत, शहरातील स्थलांतरित ३३ केव्ही लाईनच्या विनापरवाना कामाची खातेनिहाय चौकशी करावी. र...
error: Content is protected !!