Homeनांदेडविश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य" -- खा अशोक चव्हाण

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड l जगाच्या कल्याणासाठी होणारा हा महायज्ञ आहे. या यज्ञातुन अनेक चांगल्या गोष्टी जगाच्या कल्याण्यासाठी होत आहेत.यातुन विश्वावर येणारे संकट दुर होईल . यासाठी केदारश्वर रावल जगतगुरु हे यज्ञ करत आहे. तो महायज्ञ आपल्या नांदेड जिल्हयात होत आहे. या महायज्ञामुळे नांदेडकरांचे भाग्य उजाळले आहे. या महायज्ञाचा लाभ येथील जनतेने घ्यावा असे आवाहन करुत जगतगुरु हे नेहमी नांदेडकराच्या उद्धारसाठी प्रयत्न करत आलेत.त्याच्यामुळे मला या सोहळ्याचा भाग होता आले असे मत खा .अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

गोपाळचावडी येथील श्री दशमुखाश्रम भिमाशंकर नगर येथे विश्वशांती महायज्ञ तथा पट्टाभिषेक रजत महोत्सवाचे आयोजक श्री हिमवत केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ रावल श्री श्री श्री १००८ जगतगुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी दि ५ ते १२ दरम्यान आयोजन केले आहे .

IMG 20260210 WA0004 विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य" -- खा अशोक चव्हाण

या ंमहोत्सवाच्या पाचव्या दिवशी शिवकथा सोहळ्यात कनार्टक भाजपाचे प्रदेशध्यक्ष आ.बी वाय विरेद्र यांची उपस्थिती होती. यावेळी या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण ‚ माजी आमदार ईश्वरराव भोसीकर,मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे, माजी आ अमरनाथ राजूरकर ‚किशोर स्वामी‚बालाजी पांडागळे ‚संजय घोगरे पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.

पुढे बोलतांना खा.चव्हाण म्हणाले ‚ नांदेड येथे होत असलेल्या विश्‍वशांती महायज्ञ, सौहार्द आणि सनातन धर्माच्या मूल्यांचे संवर्धन साठी आहे. या महायत राज्यासह परराज्यातील संत महंताची उपस्थित आहेत.हा महायज्ञ विश्वाच्या कल्याणासाठी या यज्ञात आह्ती देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटावर मात करण्याची शक्ती या महायज्ञातुन मिळणार आहे. हा महायज्ञ आपल्या नांदेड जिल्हयात होत असल्याने आपले भाग्य उजळले असल्याचे सांगितले.तर आपले भाग्य मोठे आहे.

मी या सोहळ्याचा स्वागताध्यक्ष आहे. हि सेवा करण्याची संधी मला जगतगरु यांनी दिल्याचे हि त्यांनी सांगितले. तर कर्नाटक भाजपाचे प्रदेशध्यक्ष आ.बि वाय विरेद्रये यांनी जगतगुरुच्या आशिर्वादांने आम्हाला कर्नाटकात जनसेवेची संधी मिळाली असल्याचे सांगत जगतगुरुमुळेच जगाला समता बंधुता भायीचारा मिळाला आहे.

त्याच्या योगदानामुळेच हे राष्ट्र सनातनाच्या मार्गावर आहे .असे ते म्हणाले.हिमालयात तपश्चर्या करून सनातन धर्माचे कार्य करणारे जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज या यज्ञाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. १०८ जण एकाच वेळी यज्ञ करू शकतील अशी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments