Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ठोस पाऊल असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक संकल्प व्यक्त केले व ते संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रोडमॅपही सादर केला, असे त्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करताना सांगितले. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, उर्जानिर्मिती, औद्योगिक-आर्थिक विकास व रोजगारनिर्मिती, सामाजिक कल्याण तसेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासह शेतकरी, महिला, युवक सारख्या समाजघटकांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करणे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची बहुप्रतिक्षित घोषणा, शेतीचे उ...
Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर | हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास भेट देत श्रीच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात नुकत्याच पूर्ण झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी मंदिर परिसरात पर्यटन विकास निधीतून सुमारे ५० लाख रुपयांच्या खर्चातून पेव्हर ब्लॉक बसविणे व टिन शेड उभारण्याचे काम करण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान, या विकासकामांमध्ये हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त करत माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री डांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत संबंधित कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याची मागणी केली. मंदिर विकास कामात शासन व मंदिर कमेटीची दिशाभूल कर...
Pota hunger stricke : पोटा शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल; आमदारांची कृषी मंत्र्यांकडे धाव, गैरव्यवहार प्रकरण शासनदरबारी

Pota hunger stricke : पोटा शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल; आमदारांची कृषी मंत्र्यांकडे धाव, गैरव्यवहार प्रकरण शासनदरबारी

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई /हिमायतनगर, अनिल मादसवार | पोटा येथील शेतकऱ्यांचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही कायम असून, या आंदोलनाची दखल घेत हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी थेट कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पशुधन खरेदी अनुदान व इतर योजनांतील कथित गैरव्यवहार आणि हेराफेरीबाबत शेतकऱ्यांनी चार दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. रखडलेली देयके तातडीने अदा करावीत व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. आमदार कोहळीकर यांनी मंत्र्यांना भेटून संपूर्ण प्रकरण शासनदरबारी मांडल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कारभारावर आता राज्य पातळीवरून लक्ष केंद्रीत झाले आहे. मंत्रिमंडळाच्या सूचनेनंतर जिल्हा कृषी अधिकारी कोणती ठोस कार्यवाही करणार, दोषींवर कारवाई होणार का, याकडे तालुक्यातील...
Mla baburao kadam kohalikar meet pardi : विजेच्या कडकडाटात शेतकरी महिलेचा मृत्यू; आमदारांची पार्डीत भेट, तातडीच्या मदतीचे आश्वासन

Mla baburao kadam kohalikar meet pardi : विजेच्या कडकडाटात शेतकरी महिलेचा मृत्यू; आमदारांची पार्डीत भेट, तातडीच्या मदतीचे आश्वासन

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे पार्डी येथे दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात विजेच्या कडकडाटामुळे शेतकरी महिला विशाखा सचिन येलकेवाड वय 30 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेनंतर हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी बुधवारी पार्डी येथे जाऊन मयत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या दुःखद प्रसंगी शासनाची आर्थिक मदत तातडीने मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदारांनी हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मयताच्या कुटुंबीयांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी प्रताप देशमुख सरसमकर, राजू पाटील सील्लोडकर यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते व मयत महिले...
Mp Ashok Chavhan : भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

Mp Ashok Chavhan : भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड l भारत - अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी राज्यसभेचे खा. अशोकराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही नियुक्ती जाहीर केली. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, संसदीय पातळीवर संवाद वाढविणे तसेच परस्पर सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या संसदीय मैत्री गटाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून दोन्ही देशांतील लोकप्रतिनिधींमध्ये संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याला चालना मिळणार आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आभार मानले असून, या नियुक्तीमुळे भारत - अर्जेंटिना संबंधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त ...
Prataprao Patil Chikhlikar : लोहा तालुक्यात पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – प्रतापराव पाटील चिखलीकर

Prataprao Patil Chikhlikar : लोहा तालुक्यात पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
लोहा| तालुक्यातील पाणीटंचाई निवारण आराखडा केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी स्पष्ट सूचना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. गावांनी ज्या गरजा नोंदविल्या आहेत त्यांची तातडीने पूर्तता करावी. हातपंप दुरुस्तीसाठी कोणत्याही गावातून पैसे घेऊ नयेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. लोहा तहसील कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी दोन वाजता पाणीटंचाई निवारण आढावा बैठक पार पडली. बैठकीस कंधार उपविभागीय अधिकारी नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, कंधार उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, माजी पंचायत समिती सभापती आनंदराव शिंदे, कृउबा उपसभापती अन्नाराव पवार, विविध विभागांचे उपअभियंते, गटविकास अधिकारी कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी कासराळे, जीवन प्राधिकरण व जि.प. बांधकाम विभागाचे अधिकारी, वीज महावितरणचे अधिकारी, ताल...
Mla prataprao patil chikhalikar : जल जीवन योजनेच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांना भेटणार-आमदार प्रताप पाटील चिखलीकर

Mla prataprao patil chikhalikar : जल जीवन योजनेच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांना भेटणार-आमदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| नांदेड जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षापासून जल जीवन योजनेची कामे मोठ्या प्रमाणात बोगस व चुकीच्या पद्धतीने झालेली असून या कामामुळे विकास कामामध्ये मोठी अनियमितपणा आली आहे. या सर्व कामांची चौकशी व्हावी यासाठी लवकरच पाणीपुरवठा मंत्र्यांची भेट घेऊन या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी लवकरच करणार असल्याचे उद्गार लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कंधार येथील पाणीटंचाईच्या कृती आढावा बैठकीत काढले. पंचायत समिती कंधार येथे १८ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता पाणी टंचाई कृती आराखडा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा कंधार मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश पाटील,माजी जि प सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी...
Hadgaon News : हदगाव तहसील व पंचायत समितीत नागरिकांची हेळसांड थांबवा – अमोल पाटील रुईकर

Hadgaon News : हदगाव तहसील व पंचायत समितीत नागरिकांची हेळसांड थांबवा – अमोल पाटील रुईकर

नांदेड, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे | येथील तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. विविध शासकीय योजनांचे प्रस्ताव प्रलंबित राहिल्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाचे खेटे मारावे लागत असल्याची तक्रार समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल पाटील रुईकर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, वृक्ष लागवड, पानंद रस्ते, घरकुल, रमाई योजना तसेच पंतप्रधान घरकुल योजनेचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रस्ताव मंजूर होऊनही निधी वितरणात होत असलेल्या विलंबामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच तहसील कार्य...
Rajya Sabha : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

Rajya Sabha : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

नांदेड, राजकीय
नवी दिल्ली| भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या 16 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागासाठी ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. या निवडणुकीची 26 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2026 असेल. अ...
Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

नांदेड, राजकीय
नांदेडचा महाउत्सव म्हणून ओळखला जाणारा 'कुसुम महोत्सव' यावर्षी २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च, असा तीन दिवस असेल. या महोत्सवातील सर्व कार्यक्रम नांदेड शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात होतील. डॉ. शंकरराव चव्हाण व कै.सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २०२० मध्ये माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरु करण्यात आला. कोरोनाचे एक वर्ष वगळता दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबवला जातो आहे. पहिला दिवसः (मराठी भाषा गौरव दिन) शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘द फोक मराठी’ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा १०० कलावंतांचा संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील लोककला, लोकवाद्य तसेच लोकनृत्यांचा आनंद घेता येईल. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध आरजे अमित करणार आहे. दुसरा दिवसः शनिवारी...
error: Content is protected !!