election preparations : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी
छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व धाराशिव या चार जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज जिल्हानिहाय निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त करत निर्भय, पारदर्शक व शांततामय मतदान प्रक्रिया पार पडेल, तसेच मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास आयुक्त वाघमारे यांनी व्यक्त केला. मतदारांमध्ये मतदानाबाबत अधिक व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
या आढावा बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव सुर्या कृष्णमुर्ती, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, परभणी...









