Mla. Chikhlikar : आ. चिखलीकर यांची आश्वासनपूर्ती ; लोहा नगरपालिकेत ९७ घरकुल लाभार्थ्यांना १ कोटी ३ लाख रुपयांचे अनुदान वाटप
लोहा | नगरपालिका निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रखडलेल्या घरकुल लाभार्थ्यांना न्याय दिला आहे. लोहा नगरपालिकेच्या सभागृहात आज युवा नेते सचिन पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष शरद पवार व उपनगराध्यक्ष करीम शेख यांच्या हस्ते ९७ घरकुल लाभार्थ्यांना एकूण १ कोटी ३ लाख रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल योजनेचे अनुदान रखडले होते. निवडणूक काळात “निवडणूक संपल्यानंतर अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल,” असे आश्वासन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले होते. त्या शब्दाची आज प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शे...









