Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Rafiqbhai met collecter : हिमायतनगरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

Rafiqbhai met collecter : हिमायतनगरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांसह नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान हिमायतनगर शहराच्या सर्वांगीण विकासा संदर्भात चर्चा करण्यात आली. नगरपंचायतीच्या माध्यमातून नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व विकासकामे प्रभावीपणे राबविण्यास प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, माजी नगराध्यक्ष अखिलभाई, तसेच नगरसेवक समदखान, सरदार खान, विनोद गुंडेवार, अब्दुल कलीम, इलियास भाई, एम. मुजतबा मतीन, फिरदौस भाई यांच्यासह अन्य नवनिर्वाचित नगरसेवक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ...
Meyor Rafiq Seth : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

Meyor Rafiq Seth : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या पदग्रहण सोहळ्याने शहरात राजकीय व सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदभार स्वीकारण्याचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला. गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या निवासस्थानापासून फटाक्यांच्या आतषबाजीत व घोषणांनी दणदणीत भव्य रॅली नगरपंचायत कार्यालया पर्यंत काढण्यात आली. या रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत संपूर्ण हिमायतनगरचे लक्ष वेधून घेतले. यानंतर नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी मंचावर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, नवनिर्वाचित नगरसेवक, विविध पक्षांचे पदा...
Ashish Sakwan Honored : हिमायतनगर नगरपंचायत पदग्रहण सोहळ्यात भाजप नगरसेवक आशिष सकवान यांच्यासह त्यांच्या वडिलांचाही झाला सन्मान

Ashish Sakwan Honored : हिमायतनगर नगरपंचायत पदग्रहण सोहळ्यात भाजप नगरसेवक आशिष सकवान यांच्यासह त्यांच्या वडिलांचाही झाला सन्मान

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील नगरपंचायत पदग्रहण सोहळ्यानिमित्त प्रभाग क्रमांक १० मधील सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने व भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यामुळे भाजपचे उमेदवार आशिष बाबुराव सकवान हे मताधिक्याने निवडून आले. गुरुवारी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर नगरसेवकपदाचा बहुमान मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळवल्या नंतर, नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष रफिक सेठ व सर्व नगरसेवक यांच्या आयोजित पदग्रहण सोहळ्यात वॉर्ड क्रमांक 10 चे भाजपा नगरसेवक आशिष सकवान यांचा आणि त्यांचे वडील बाबुराव सकवान यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी श्री. ताडेवाड यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. राज...
Nanded ; भाजपाच्या नांदेड महानगर चिटणीसपदी शैलेंद्र ठाकूर

Nanded ; भाजपाच्या नांदेड महानगर चिटणीसपदी शैलेंद्र ठाकूर

नांदेड, राजकीय
नांदेड l भारतीय जनता पार्टीच्या नांदेड महानगर चिटणीसपदी शेलेंद्रसिंह ठाकूर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून संघात पदाधिकारी म्हणून कार्य केले.ठाकूर यांनी संघटनेबरोबरच भाजपात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.मागील कामाचा अनुभव आणि संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव, पक्षनिष्ठा लक्षात घेऊन त्यांच्याकडे पुन्हा शहर चिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्ती पत्र देताना प्रविण साले,चैतन्यबापू देशमुख, मिलिंद देशमुख यांच्यासह भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या निवडीबद्दल शैलेंद्रसिंह ठाकूर यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे....
Nanded ; नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजय लक्ष्य ‘इलेक्शन मास्टरमाईंड’ दिलीप ठाकूर यांचा प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार

Nanded ; नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजय लक्ष्य ‘इलेक्शन मास्टरमाईंड’ दिलीप ठाकूर यांचा प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार

नांदेड, राजकीय
नांदेड | नांदेड महानगरपालिकेवर भाजपाचाच महापौर बसावा, या ठाम निर्धाराने भाजपाने निवडणूक रणनितीला वेग दिला असून, भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रचार कार्यालय सुरू झाल्यापासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत अक्षरशः आपला बाडबिस्तारा सोबत घेऊन मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयातच मुक्काम ठोकला आहे. त्यांच्या या अहोरात्र सुरू असलेल्या कार्याची दखल घेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. दिलीप ठाकूर हे केवळ पदाधिकारी नसून, निवडणूक विजयाचे अनुभवी शिल्पकार म्हणून ओळखले जातात. सन १९९५ पासून आतापर्यंत झालेल्या तब्बल नऊ लोकसभा व आठ विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पूर्णवेळ झोकून देत प्रचार यंत्रणा उभी केली आहे. निवडणूक व्यवस्थापनातील अचूक रणनीती, काटेकोर नियोजन आणि दूरदृष्टीमुळे त्यांची ओळख ‘इलेक्...
Publicly appointed Mayor Rafiq Seth : २०२७ मध्ये नूतन पत्रकार भवनात भव्य पत्रकार सन्मान सोहळा घेणार – लोकनियुक्त नगराध्यक्ष रफिक सेठ

Publicly appointed Mayor Rafiq Seth : २०२७ मध्ये नूतन पत्रकार भवनात भव्य पत्रकार सन्मान सोहळा घेणार – लोकनियुक्त नगराध्यक्ष रफिक सेठ

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या पहिल्या मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ च्या स्मृतिप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या दर्पण दिन व मराठी पत्रकार दिनानिमित्त, पुढील वर्षी म्हणजेच २०२७ साली नूतन पत्रकार भवनात दर्पण दिन व भव्य पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन हिमायतनगर नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रफिक सेठ (शेख रफिक शेख महेबूब) यांनी दिले. दर्पण दिनानिमित्त मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ०२ वाजता नगराध्यक्ष कार्यालय, हिमायतनगर (जि. नांदेड) येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा प्रमाणपत्र व पेन देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना दर्पण दिन व राष्ट्रीय मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्य...
Kandhar Grampanchayat : कंधार ३ तर लोहा तालुक्यातील ६ बंजारा तांड्याना मिळाला ग्रामपंचायतचा दर्जा

Kandhar Grampanchayat : कंधार ३ तर लोहा तालुक्यातील ६ बंजारा तांड्याना मिळाला ग्रामपंचायतचा दर्जा

नांदेड, राजकीय
कंधार (सचिन मोरे) दिनांक ३१ डिसेंबर २०२५ च्या आदेशान्वये व प्रस्तुत अधिसूचनेच्या अनुषंगाने कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत नागलगावचे विभाजन करून दुर्गातांडा, उदातांडा व शिराढोण ग्रामपंचायतचे विभाजन करून नाईक नगर हे ३ तर लोहा तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धनाजीतांडा, परसरामतांडा, रूपशिंगतांडा, फुलमळातांडा, गोविंदतांडा, तर लिंबोटी ग्रामपंचायत अंतर्गत असलेला येलदरी तांडा अशा एकूण ९ तांड्यासाठी महसुली दर्जा प्राप्त होऊन, स्वातंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचे शासनाचे आदेश प्राप्त झाल्यामुळे कंधार व लोहा तालुक्यातील तांडा वाशीयामध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे ऐकावयास मिळत आहे.या महत्व पूर्ण निर्णयामुळे तांडा विकासाचा मार्ग खर्या अर्थाने मोकळा झाल्याची भावना "संत सेवालाल महाराज बंजारा लमानतांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य भगवान राठोड यांनी व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यातील बंजारा...
Darshana chayal : भाजपाच्या नगरसेविका सौ. दर्शना चायल यांचा नाभिक समाजाकडून भव्य सत्कार

Darshana chayal : भाजपाच्या नगरसेविका सौ. दर्शना चायल यांचा नाभिक समाजाकडून भव्य सत्कार

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक १ मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. दर्शना शरद चायल यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. हा नाभिक समाजाच्या महिलेचा ऐतिहासिक विजय असून, या विजयाच्या निमित्ताने दि. ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाभिक समाजाच्या वतीने भव्य सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुका अध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर येथील नाभिक समाज बांधवांनी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दर्शना चायल यांच्या निवासस्थानी भेट देऊन पुष्पहार, शाल व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देत स्वागत सत्कार केला. यावेळी त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक ...
Mayor Sheikh Rafiq : नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक व नगरसेवकांचा श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे सत्कार

Mayor Sheikh Rafiq : नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक व नगरसेवकांचा श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे सत्कार

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नुकत्याच संपन्न झालेल्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्यासह सर्व नगरसेवकांचा श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते व संचालकांच्या हस्ते सन्मानपूर्वक स्वागत करून निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित जनप्रतिनिधींना विश्वास व्यक्त करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व यशस्वी ठरो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. नगरविकास, सार्वजनिक सोयीसुविधा आणि धार्मिक स्थळांच्या सु­वीधांच्या उभारणीसाठी ट्रस्ट व नगरपंचायत यांच्यात सहकार्यात्मक भूमिका राहील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. परमेश्वर मंदीरात संपन्न झालेल्या या बैठकीत आगामी काळात होणारे सण-उत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे...
Election Using Ballot Papers : आगामी जि. प. व पं. स. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या!

Election Using Ballot Papers : आगामी जि. प. व पं. स. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या!

नांदेड, राजकीय
कंधार, सचीन मोरे| ईव्हीएम मशिनच्या पारदर्शकतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे निवडणूक यंत्रणाच कुचकामी ठरते आहे. यात सर्वसामान्य मतदारांच्या मतांची चोरी होत असल्याची भीती व्यक्त करत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प.) चे ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र येईलवाड यांनी निवेदनाद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. आपल्याच देशात राष्ट्रपती, शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदारसंघासह विधान परिषदेच्या निवडणुका पोस्टल व बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. मात्र सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएम मशिनद्वारे घेतल्या जात आहेत. या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार आहे. प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजणी झालेल्या मतांत तफावती आढळून आल्या आहेत. यामुळे ईव्हीएम मशिनमुळे सर्वसामान्य मतदारांचा मताधि...
error: Content is protected !!