HomeनांदेडRafiqbhai met collecter : हिमायतनगरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी घेतली जिल्हाधिकारी...

Rafiqbhai met collecter : हिमायतनगरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांसह नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या भेटीदरम्यान हिमायतनगर शहराच्या सर्वांगीण विकासा संदर्भात चर्चा करण्यात आली. नगरपंचायतीच्या माध्यमातून नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व विकासकामे प्रभावीपणे राबविण्यास प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, माजी नगराध्यक्ष अखिलभाई, तसेच नगरसेवक समदखान, सरदार खान, विनोद गुंडेवार, अब्दुल कलीम, इलियास भाई, एम. मुजतबा मतीन, फिरदौस भाई यांच्यासह अन्य नवनिर्वाचित नगरसेवक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करत हिमायतनगरच्या विकासासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments