Thursday, May 14

Gram Panchayat Sarpanch : गोपाळ चावडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १४ आगस्ट रोजी होणार निवड – NNL

नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील गोपाळचावडी ग्रामपंचायत कार्यालय सरपंच पदासाठी १४ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता निवडणूक होणार आहे. सदरील निवडणूक सरपंच श्रीमती गिरिजाबाई डाकोरे यांनी दिलेल्या राजीनामा नंतर होत असून, सुरेखा लाखे यांच सरपंच पदासाठी नाव चर्चेत असल्याचे समजते.

पंच वार्षिक निवडणूकीत गेल्या अडीच वर्षा पूर्वी नवचैतन्य ग्रामविकास पॅनलने साहेबराव सेलुकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूक मध्ये आकरा पैकी आकरा जागा एकतर्फी विजय मिळवला होता, व सरपंचपदाचे आरक्षण एस. सी. महिला साठी आरक्षीत असल्याने पहिल्या अडीच वर्षासाठी श्रीमती गिरिजाबाई डाकोरे यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती.

अडीच वर्षे कालवधी झाल्यानंतर ठरल्या प्रमाणे खांदेपालट करण्यासाठी सरपंच डाकोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर १४ आगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय गोपाळचावडी येथे पिठसन अधिकारी तथा तलाठी भिंगोरे व ग्रामविकास अधिकारी पि. डी. उबाळे यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेऊन नव्याने सरपंच पदासाठी निवड होणार आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य यांना ८ आगस्ट रोजी नोटीस देण्यात आल्या आहेत. नव्याने होणाऱ्या सरपंच पदासाठी सौ. सुरेखा प्रदीप लाखे यांच्ये नाव चर्चेत असुन बिनविरोध निवड होणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!