Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Nanded Waghala Municipal Corporation : नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक; विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित  

Nanded Waghala Municipal Corporation : नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक; विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित  

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्य निवडणूक आयोगाकडून नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यात महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश निर्गमीत केले आहेत.  निवडणूक कालावधीत विश्रामगृह वापरावरील निर्बंध - शासकीय व निवडणूकीच्‍या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त, इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस महानगरपालिका मतदार संघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहात थांबण्‍यासाठी संबंधित खात्‍याने दिलेला अधिकृत परवाना असल्‍याशिवाय...
Sai-Subhash : लोह्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष-नगरसेवकांचा विजयरथ नांदेडमध्ये धडकला; “साई–सुभाष”वर उधळला विजयाचा गुलाल

Sai-Subhash : लोह्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष-नगरसेवकांचा विजयरथ नांदेडमध्ये धडकला; “साई–सुभाष”वर उधळला विजयाचा गुलाल

नांदेड, राजकीय
लोहा| राज्याचे तसेच माजी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा घेऊनही लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मतदारांनी स्पष्ट नकार दिला असून सूर्यवंशी कुटुंबासह भाजपाचा स्थानिक राजकारणातील एकछत्री अंमल जनतेने मोडीत काढला आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार आणि विजयी १७ नगरसेवकांसह जवळपास हजारो कार्यकर्ते व शंभरहून अधिक वाहनांच्या ताफ्यासह शनिवारी (२७ डिसेंबर) सकाळी दहाच्या सुमारास नांदेडच्या वसंतनगर येथील “साई–सुभाष” वर दाखल झाले. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व कुटुंबीयांचा भव्य खारीक-खोबऱ्याच्या हारांनी सत्कार करून विजयाचा गुलाल व पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्यात आला. यंदाची लोहा नगरपालिकेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली. एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी देऊनही सर्वांचे पराभव झाल्याने भाजपाला मोठा राजकीय धक्का बसला. शेतकरी कुटुंबातील, जनमाणसांत मिसळणाऱ्या कार्यकर्त्यांवर मतदारांनी व...
Subhashrao Balpelwad : शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक सुभाषराव बलपेलवाड यांचा पतंजली योग समितीकडून सत्कार

Subhashrao Balpelwad : शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक सुभाषराव बलपेलवाड यांचा पतंजली योग समितीकडून सत्कार

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायतच्या वार्ड क्रमांक १७ मधून निवडून आलेले शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक सुभाषराव बलपेलवाड यांचा हिमायतनगर पतंजली योग समितीच्या वतीने रविवारी आयोजित योग वर्गात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन बलपेलवाड यांचा सन्मान केला तसेच त्यांच्या भावी सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सत्कारप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सुभाषराव बलपेलवाड यांनी योग, आरोग्य व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत जनहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे न्यायावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला पतंजली योग समितीचे रामराव सूर्यवंशी, अक्कलवाड सर, वराडे सर, बाळूअण्णा चौरे, साहेबराव आष्टकर, अविनाश संगणवार, पळशीकर काका, मारोती लुमदे, गौतम हनवते, अनिल दमकोडवार, विलास वानखेडे आदी पदाधिकारी, योगसाधक, पत...
Subhash Balpelwad : हिमायतनगरमध्ये प्रलोभनांचे राजकारण फसले; जनतेने दिला सुभाष बलपेलवाडांना कौल

Subhash Balpelwad : हिमायतनगरमध्ये प्रलोभनांचे राजकारण फसले; जनतेने दिला सुभाष बलपेलवाडांना कौल

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान विविध पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांना प्रलोभने दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिमायतनगरच्या मायबाप जनतेने विरोधकांच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता आमच्यावर विश्वास दाखविला, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक १७ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष बलपेलवाड (People voted for Subhash Balpelwad) यांनी दिली. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली जनतेने आम्हाला भरभरून पाठिंबा दिला आणि विजयी केले. नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष बलपेलवाड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पैशाच्या व आमिषांच्या जोरावर मत विकत घेण्याचे राजकारण हिमायतनगरने नाकारले आहे. मायबाप जनतेने दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी जबाबदारी असून, त्याची उतराई विकास कामांतूनच करू.” या विजयामागे आमदार बाबुराव कदम कोह...
Sharad Pawar : लोह्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार यांचा पुण्यात जंगी सत्कार

Sharad Pawar : लोह्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार यांचा पुण्यात जंगी सत्कार

नांदेड, पुणे, राजकीय
लोहा/पुणे│ लोहा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार यांचा पुणे येथे लोहा–कंधार तालुक्यातील भूमिपुत्र, स्नेहीवर्ग व मित्रपरिवार यांनी उत्स्फूर्त स्वागत व जंगी सत्कार केला. शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या शरद पवार यांनी प्रबळ आर्थिक पाठबळ असलेल्या प्रतिस्पर्धी गजानन सूर्यवंशी यांचा दारूण पराभव करून विजय मिळवला आहे. या दौऱ्यात नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्यासोबत नगरसेवक करीम शेख, भास्कर पवार, कंधार नगरपंचायत उमेदवार स्वप्नील लुंगारे, माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, जफरउल्लाखान, तसेच कंधार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर भोसीकर यांचा समावेश होता. प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करताना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म...
Loha Municipality : लोहा नगरपालिका : पवार–मुकदम सहाव्यांदा तर धुतमल पाचव्यांदा प्रभावी ; पहिल्यांदाच १६ नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

Loha Municipality : लोहा नगरपालिका : पवार–मुकदम सहाव्यांदा तर धुतमल पाचव्यांदा प्रभावी ; पहिल्यांदाच १६ नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा नगर पालिका निवडणुकीत पारंपरिक शक्तिसमीकरणांना धक्का बसत तीन दाम्पत्यांचा पराभव झाला, तर पवार–मुकदम कुटुंबांनी सहाव्यांदा आणि धुतमल कुटुंबाने पाचव्यांदा सभागृहात पुनरागमनाची नोंद केली आहे. यावेळी तब्बल १६ नवीन चेहरे पहिल्यांदाच नगरपालिकेच्या सभागृहात दाखल झाले आहेत. १९९८ नंतर तब्बल २७ वर्षांनी पवार पाटील परिवाराच्या हाती पुन्हा नगरपालिकेची सूत्रे गेली. ‘पवार’ आडनावाचे चार सदस्य, ‘काकू–पुतणी’ जोडी आणि धुतमल परिवारातील दोन सदस्य अशा कुटुंबीय राजकारणाच्या प्रभावी नोंदी यंदाच्या निवडणुकीत उमटल्या. नगर पालिकेच्या स्थापनेनंतर २००८ चा अपवाद वगळता माजी सभापती व्यंकटराव मुकदम यांच्या कुटुंबाने सहा वेळा नेतृत्व केले आहे. माजी नगराध्यक्षा जिजाबाई मुकदम तीन वेळा तर माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम यांनी तीन कार्यकाळांचे प्रतिनिधित्व केले आहे. पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या...
Uddhav thackeray group : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : उद्धव ठाकरे गटाचे स्वबळावर शक्तिप्रदर्शन, तीन उमेदवार दणदणीत विजयी

Uddhav thackeray group : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : उद्धव ठाकरे गटाचे स्वबळावर शक्तिप्रदर्शन, तीन उमेदवार दणदणीत विजयी

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नगरपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने स्वबळावर लढत देऊन आपली स्वतंत्र ताकद अधोरेखित केली असून, गटाचे तीन उमेदवार मताधिक्याने विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही मोठ्या नेत्याला प्रचारासाठी न बोलावता स्थानिक जनतेच्या विश्वासावर ही लढत जिंकत ठाकरे गटाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक सेठ यांच्यासह आठ नगरसेवक निवडून आणले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून सरदार खान हे एकमेव उमेदवार विजयी झाले.   दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर प्रभावी संपर्क, संघटन...
Nanded ; विकसित नांदेडसाठी महापालिकेत भाजपाची बहुमताने सत्ता आणा -खा. चव्हाण

Nanded ; विकसित नांदेडसाठी महापालिकेत भाजपाची बहुमताने सत्ता आणा -खा. चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड l देशात विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदी ,विकसित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री फडणवीस काम करीत आहेत.तसेच विकसित मराठवाडा ,विकसित नांदेड साठी नांदेड महापालिकेवर ५५ प्लस उमेदवार बहुमताने विजयी करीत भाजपाची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागा असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री ,खा. अशोकराव चव्हाण यांनी केले आहे. शहरातील ऐ. के. संभाजी मंगल कार्यालय येथे गुरुवारी माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 'गुड गव्हर्नन्स डे' अर्थात सुशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खा. चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर संघटन मंत्री संजय कौडगे, महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजुरकर, माजी मंत्री डी पी सावंत, किशोर स्वामी,नंदू कुलकर्णी, माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, माजी महापौर सुधाकर पांढरे, माजी महापौर बलवंतसिंग गाडीवाले, माजी महापौर शैलजा स्व...
Bjp : हिमायतनगर येथील भाजप कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

Bjp : हिमायतनगर येथील भाजप कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र वानखेडे, नवनिर्वाचित नगरसेवक सौ. दर्शनाताई शरद चायल, आशिष सकवान, भारत डाके, हिमायतनगर भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल, शहराध्यक्ष विपुल दंडेवाड, तालुका उपाध्यक्ष विलास वानखेडे, युवा मोर्चा अध्यक्ष निकु ठाकूर यांच्यासह लक्ष्मण डांगे, राम सूर्यवंशी, बालाजी ढोणे, दुर्गेश मंडोजवार, विष्णू वानखेडे, प्रकाश सेवनकर, राज यशवंतकर, डुडुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी अटलजींच्या राष्ट्रनिष्ठ, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर प्रकाश टाकत त्यांचे कार्य व योगदान स्मरणात ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला....
error: Content is protected !!