HomeनांदेडSubhashrao Balpelwad : शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक सुभाषराव बलपेलवाड यांचा पतंजली...

Subhashrao Balpelwad : शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक सुभाषराव बलपेलवाड यांचा पतंजली योग समितीकडून सत्कार

हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायतच्या वार्ड क्रमांक १७ मधून निवडून आलेले शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक सुभाषराव बलपेलवाड यांचा हिमायतनगर पतंजली योग समितीच्या वतीने रविवारी आयोजित योग वर्गात भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन बलपेलवाड यांचा सन्मान केला तसेच त्यांच्या भावी सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

सत्कारप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सुभाषराव बलपेलवाड यांनी योग, आरोग्य व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत जनहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे न्यायावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला पतंजली योग समितीचे रामराव सूर्यवंशी, अक्कलवाड सर, वराडे सर, बाळूअण्णा चौरे, साहेबराव आष्टकर, अविनाश संगणवार, पळशीकर काका, मारोती लुमदे, गौतम हनवते, अनिल दमकोडवार, विलास वानखेडे आदी पदाधिकारी, योगसाधक, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments