Homeसोशल वर्कBlood donation camp ; नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन -...

Blood donation camp ; नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे l पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज किनवट शहरातील साईबाबा मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हे शिबिर किनवट- माहुर विधानसभेचे लोकप्रिय आ. भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वागतभाऊ आयनेनिवार व भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आशुतोष बेद्रे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या घेण्यात आले. रक्त संकलनासाठी गोळवलकर गुरुजी रक्तकेंद्र , नांदेड ची सर्व टिमचे सहकार्य लाभले.

या शिबिरामध्ये मोदीजींवर प्रेम करणाऱ्या एकुण 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले , या वेळी या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समितीचे नवनियुक्त सदस्य दिनकर चाडावार , किनवटचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार , शहराध्यक्ष संतोष चरमनवार , माजी युवामोर्चा तालुकाध्यक्ष उमाकांत कऱ्हाळे , सतिश नेम्मानिवार ,डॉ. प्रदीप एडके , सतिश बिराजदार , माजी नगरसेवक शिवा आंधळे , बाबु जाटवे , बाबु तक्कलवार , निकेतन सुरोशे , कृष्णा इटकेपेल्लीवार , शहराध्यक्ष अक्षय पावडे , शुभम काळे , ऋषिकेश चौधरी , बबलु नाईक , सुमित नरवते , सुरेश साकपेल्लीवार , विक्रम जाधव इ.सह युवामोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments